अलिगढ : जवान शहरातील एका घरात बिबट्या (Leopard in Aligarh) घुसला. घरात बिबट्या घुसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक हातात लाठ्या घेऊन बाहेर पडले. जवान नगरात बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. स्थानिक नागरिकांनी पोलीस व वनविभागाला माहिती दिली. हा बिबट्या घरात कसा घुसला, कुठून आला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली (Leopard in house in aligarh) नाही.
परिसरात खळबळ :वनविभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचवेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. पोलीस प्रशासन आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याआधीही अलिगडमध्ये शाळेच्या वर्गात बिबट्या घुसला (Leopard entered in aligarh) होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. बिबट्याने एका मुलालाही जखमी केले होते. ही घटना छर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निहाल सिंग इंटर कॉलेजची आहे. याचवेळी जवान नगरात बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात थेट घटना कैद झाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, परिसरात भीतीचे वातावरण (Leopard entered in house in aligarh) आहे.
नाशिकमध्ये शेतात घुसला होता बिबट्या :नाशिकच्या तालुक्यातील पिंपळगाव भटाटे गावात राहणाऱ्या गोविंद इंडोळे या शेतकऱ्यांच्या घरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली होती. गोविंद इंडोळे हे सकाळी कुटुंबासमवेत शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर बिबट्या घराच्या मागच्या दरवाजाने आता घुसला आणि स्वयंपाक घरातील एका कोपऱ्यात जाऊन बसला होता. गोविंद हे पुढच्या दरवाजाने आता येताच त्यांना बिबट्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी माघारी फिरून दरवाजा लावून घेतला होता. याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभागाची टीम तेथे दाखल झाली होती. बिबट्या घरात घुसल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.
बिबट्याचे हॉटस्पॉट :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्यांचे हॉटस्पॉट म्हणता येतील. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होतात. या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले. अनेकदा काही बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून (Leopard entered in house) आले.