नवी दिल्ली- केंद्र सरकारने जाहीर केलेली नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणजे कायदेशीर आणि संघटित लूट असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. काही दशकांमधून तयार केलेली अमूल्य सार्वजनिक संपत्ती ही काही निवडक हातात दिली जात आहे.
लोकांच्या कष्टातून तयार केलेली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ही केंद्र सरकारकडून अब्जाधीश मित्रांना दिली जात असल्याचा काँग्रेसने दावा केला. पहिल्यांदा नोटाबंदी हे मोठे संकट आले होते. ही संघटित आणि कायदेशीर लूट असल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी योग्य वर्णन केले होते. आता रोखीकरण (मॉनिटायझेशन) मेळा आला आहे. अनमोल अशी सार्वजनिक संपत्ती ही निवडक लोकांच्या हातात दिली जात आहे. ही लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली.
हेही वाचा-जाणून घ्या, नारायण राणे संदर्भात आज दिवसभरात नेमके काय घडले
प्रियंका गांधींनीही केली टीका
नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणजे आत्मनिर्भर भारतचा जुमला असल्याची टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी केली आहे. मात्र, देशाला अब्जाधीश मित्रांवर अवलंबून ठेवले आहे. जुमला आत्मनिर्भर देताना त्यांनी संपूर्ण सरकारला अब्जाधीश मित्रावर अवलंबून ठेवले आहे. हे सर्व काम त्यांच्या अब्जाधीश मित्रांसाठी आहे. सर्व संपत्तीदेखील त्यांच्यासाठी असल्याचे प्रियंका गांधी वड्रा यांनी हिंदीत ट्विट केले आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये लोकांच्या कष्टाने कमविलेली लाखो कोटी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता सरकार त्यांच्या अब्जाधीश मित्रांना देत आहे.