महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस आणि डाव्या पक्षांची युती भाजपा-टीएमसीला पराभूत करणार - अधिर चौधरी - पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची युती

डावे-काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष गटांची महायुती टीएमसी आणि भाजपा या दोघांना पराभूत करेल, असा विश्वास काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे.

अधिर रंजन चौधरी
अधिर रंजन चौधरी

By

Published : Feb 28, 2021, 3:42 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगलामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यात सत्ता कायम ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असून काँग्रेस पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. डावे-काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष गटांची महायुती टीएमसी आणि भाजपा या दोघांना पराभूत करेल, असा विश्वास काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी व्यक्त केला. शहरातील ब्रिगेड परेड मैदानावर संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.

भाजप आणि सत्ताधारी टीएमसीची अशी इच्छा आहे की या दोन पक्षांव्यतिरिक्त राज्यात इतर कोणत्याही राजकीय पक्ष अस्तित्वात येऊ नये, जे त्यांच्या वाटेत आडथळा निर्माण करतील. भविष्यात राज्यात भाजपा किंवा टीएमसी नाही. तर फक्त महायुती राहील, असे ते ठामपणे म्हणाले.

काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीचा सामना तृणमूल काँग्रेस, भाजप आणि डावे-काँग्रेस युती यांच्यात होणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी 2016 मध्येही एकत्र निवडणूक लढवली होती. तर 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी वेगळी वाट धरली होती. मात्र, आता पुन्हा 2021 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी हातमिळवणी केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

ABOUT THE AUTHOR

...view details