वॉशिंग्टन :आर्थिक जागतिक पातळीवर सध्या अत्यंत वाईट स्थिती सुरू आहे. तिथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी काही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन ई कॉमर्स कंपनीही मोठ्या प्रमाणावर ऑफिस बंद करण्याच्या तारीत आहे का असा प्रश्न पडला आहे. याचे कारण म्हणजे 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. अॅमेझॉनने बुधवारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे कर्मचारी कपात करणार असल्याचं सांगितले आहे.( Amazon to layoff 18 thousand employee )
10 हजार कर्मचारी कामावरून काढले : सीईओ अँडी जेसी ( CEO Andy Jesse ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये आम्ही जे जाहीर केले त्यानुसार आमची भूमिका स्पष्ट आहे. जवळपास 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. 2022 नोव्हेंबरमध्ये अमेझॉनने जवळपास 10 हजार कर्मचारी कामावरून काढले होते.अमेझॉनकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ( The biggest staff cut ) असल्याचे सांगितले जात आहे. आतार्यंत 15 लाख कर्मचारी अमेझॉनसोबत काम करत होते. त्यापैकी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढण्यात आले. आता पुन्हा 18 हजार कर्मचाऱ्यांना काढले ( Amazon lays off 18,000 jobs ) जाणार आहे.