नवी दिल्ली -तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा वकील विशाल चोप्रा याने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका ( Patiala House Court ) दाखल करून बिश्नोईची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. पंजाब पोलिसांकडून लॉरेन्सचे ( Lawrence Bishnoi ) तुरुंगात एन्काउन्टर होण्याची भीती असल्याचे बिश्नोईच्या वकिलाने व्यक्त केली आहे.
बिश्नोईच्या वकिलाने ( lawrence bishnoi petition ) याचिकेत म्हटले, की लॉरेन्स बिश्नोई हा विद्यार्थी नेता आहे. राजकीय शत्रुत्वामुळे त्याला पंजाब आणि चंदीगडमधील अनेक प्रकरणांमध्ये गोवण्यात आले आहे. पंजाब पोलीस एन्काउन्टर करू शकतात, अशी भीती त्याला वाटते. याचिकेत म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोई हा मकोका प्रकरणात गेल्या एक वर्षापासून तिहार तुरुंगात बंद आहे.
नियमांचे उल्लंघन होणार असल्याचा दावा-पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान किंवा अन्य राज्याचे पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर घेऊन जाऊ शकतात. बिश्नोईला प्रोडक्शन वॉरंटवर दुसऱ्या राज्यात नेण्यापूर्वी न्यायालयाला कळवण्याचे आदेश द्यावेत आणि त्याला ताब्यात देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इतर कोणत्याही राज्यातील पोलीस, दुसऱ्या राज्याच्या पोलिसांकडे सोपवणे हे MCOCA च्या कलम 3 आणि 4 चे उल्लंघन होईल, असे याचिकेत म्हटले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचा आरोप-याचिकेत पटियाला हाऊस कोर्टाच्या आदेशाचाही हवाला देण्यात आला आहे. यामध्ये ३० नोव्हेंबर २०२१ रोजी बिश्नोई यांना दुसऱ्या राज्यात नेले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी विशाल चोप्राने न्यायालयाकडे केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचा आरोप आहे.