Lata Mangeshkar Passed Away : दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर तयारी - Singer Lata Mangeshkar
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे.शिवाजी पार्क मैदानावर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबई -गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांच्या पार्थिवावर मुंबई दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार (Lata Mangeshkar's last rites on earth) करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावरची तयारी पूर्ण करुन त्यांचे पार्थिव इथं आणलं जाईल. अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळाले आहे. तसेच लतादीदींचा पार्थिवावर अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मैदानात होणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा संदर्भात देखील तयारी सुरू करण्यात आली आहे.