महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फटाकेमुक्त दिवाळी करण्याचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आवाहन

महाराष्ट्र सरकारनेही जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी या दिवाळीत फटाके फोडण्याचे टाळावे, असे आवाहन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले आहे.

लता
लता

By

Published : Nov 9, 2020, 6:56 AM IST

नवी दिल्ली -दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाके फोडल्याने वातावरणात ध्वनी आणि हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी या दिवाळीत फटाके फोडण्याचे टाळावे, असे आवाहन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याचे पालन करावे, असेही त्या म्हणाल्या.

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. त्याच्या सल्ल्याचे अनुसरण करणे फार महत्वाचे आहे. यंदा दिव्यांचा उत्सव साजरा करूया. मास्क घाला आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या', असे आवाहन लता मंगेशकर यांनी केले.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन -

प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

या राज्यात फटाके बंदी -

प्रदूषण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाके खरेदी-विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात हरयाणा, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details