महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर म्हणाले, "पुढील काही दिवस..." - लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत बाबत महत्वाची माहिती ( Lata Mangeshkar Health Update ) समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुढील काही दिवस त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ठेवले जाणार आहे

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

By

Published : Jan 17, 2022, 11:51 PM IST

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण ( Lata Mangeshkar Corona Positive ) झाली होती. त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्वाची माहिती समोर ( Lata Mangeshkar Health Update ) आली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, पुढील काही दिवस त्यांनी आयसीयू वॉर्डमध्ये ठेवले ( Lata Mangeshkar In Icu ) जाणार आहे.

याबाबत ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतित समदानी म्हणाले की, लता मंगेशकर या अद्यापही आयसीयू वॉर्डमध्ये ( Lata Mangeshkar In Icu ) आहेत. आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. वयामुळे त्याला सावरायला वेळ लागेल. पण प्रकृती सुधारत ( Lata Mangeshkar Health Improving ) आहे. त्यांनी काल रात्री पोटभर जेवण केले आहे. तसेच, सकाळी 8.00 च्या सुमारास नाश्ताही केला आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्यावर कोरोना न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. हळूहळू आणखी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल

ABOUT THE AUTHOR

...view details