महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

युट्यूब अभिनेता राहुल वोहरा शेवटचा व्हिडिओ; कोरोनाने झाले होते निधन - rahul vohra last video

हा व्हिडिओ राहुल यांनी रुग्णालयात शूट केला होता. यात ते ऑक्सिजन मास्क याबाबत सांगत आहेत. ते म्हणाले की, 'आताच्या काळात ऑक्सिजनची खूप आवश्यकता आहे.

rahul vohra
राहुल वोहरा

By

Published : May 10, 2021, 6:06 PM IST

नवी दिल्ली - यूट्यूबवरील प्रसिद्ध अभिनेता राहुल वोहरा याचे कोरोनामुळे रविवारी निधन झाले. यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती तिवारी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच राहुल वोहराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

अभिनेता राहुल वोहराचा शेवटचा व्हिडिओ.

राहुलने शुट केलेल्या त्या व्हिडिओत काय?

हा व्हिडिओ राहुल यांनी रुग्णालयात शूट केला होता. यात ते ऑक्सिजन मास्क याबाबत सांगत आहेत. ते म्हणाले की, 'आताच्या काळात ऑक्सिजनची खूप आवश्यकता आहे. ऑक्सिजनविना रुग्ण अस्वस्थ होतो. यात ऑक्सिजन मास्क दाखवताना म्हणाले की, यात काहीच येत नाही आहे. परिचारिका आली होती. ती येते आणि चालली जाते. पुन्हा पाहायला कोणीच येत नाही. कळत नाहीये की, पाण्याच्या बाटलीत पाणी कमी ठेवायचे आहे की त्याचा प्रवाह वाढवायचा आहे? जर कुणाला हाक दिली तर ते म्हणतात की, एका मिनिटात पाठवतो. मात्र, कुणीच येत नाही'. अशा परिस्थितीत त्यांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले. त्यांचा रविवारी कोरोनाने निधन झाले. राहुल यांना द्वारका येथील आयुषमान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा -बक्सरमध्ये गंगेकिनारी आढळले सुमारे ५० मृतदेह; पाहा विदारक दृश्य

राहुलच्या पत्नीची मागणी -

राहुल यांच्या पत्नी ज्योती तिवारी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना एक मागणी केली आहे की, माझ्या राहुलचा मृत्यू झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, त्याचा मृत्यू कसा झाला हे कुणालाच माहिती नाही. काय या प्रकारे कुणावर उपचार केले जातात? आशा करते की माझ्या पतीला न्याय मिळेल. यानंतर आणखी एक राहुलचा मृत्यू नाही व्हायला हवा'.

हेही वाचा -दादरच्या गुरुद्वारात 'ऑक्सिजन लंगर', १० लाखांपेक्षा जास्त लोकांना दिले जेवण

ABOUT THE AUTHOR

...view details