तीरुपती:नवी मुंबईतील येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाला भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपूर्द केले. त्यापुर्वी त्यांनी श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे आगमन झाले. यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी , देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, आदींसह देवस्थानाचे अधिकारी उपस्थित होते.
Aaditya in Tirupati : नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वर मंदिरासाठी जमीन, आदित्य ठाकरेंनी देवस्थानला दिले पत्र - तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट
नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वर मंदिरासाठी (Shri Venkateswara Temple in Navi Mumbai) जमीन देण्याचे पत्र ( letter of handing over land) मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे (Tirumala Tirupati Devasthanam Trust) अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांना सुपूर्द केले. आदित्य यांनी आज तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरात पूजा केली.
आदित्य ठाकरे
तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर राज्य शासनाने याविषयीचा निर्णय तत्काळ घेऊन जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषना केली होती. त्यामुळे लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी स्वतः मंत्री आदित्य तिरुपतीला आले याविषयीही तीरुपती तीरुमल देवस्थानने समाधान व्यक्त करून आभार मानले आहेत.