महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लालूंच्या आशेवर पाणी; दुमका प्रकरणातील जामीनअर्जावर निवडणूक निकालानंतर सुनावणी - Jharkhand High Court on Lalu Yadav bail plea

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दुमका प्रकरणात जामीन अर्ज दाखल केली होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलली असून येत्या 27 नोव्हेंबरला ती होणार आहे.

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव

By

Published : Nov 6, 2020, 12:48 PM IST

Updated : Nov 6, 2020, 1:26 PM IST

रांची - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच निवडणुकीच्या निकालापूर्वीच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना दुमका प्रकरणात जामीन मिळणार, अशी चर्चा होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलली असून ती आता 27 नोव्हेंबरला होणार आहे.

झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्यासमोर लालूप्रसाद यादव यांच्या जामीनअर्जावर सुनावणी झाली. मात्र, या अर्जावरील उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे वेळ मागितल्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

जामीनावर 27 नोव्हेंबरला सुनावणी

देवघर कोषागार आणि चाईबासा प्रकरणात लालूप्रसादांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. दुमका कोषागार प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. दुमका प्रकरणात त्यांना सीबीआय न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा दिली आहे. दुमका प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी लालूप्रसाद यांच्यावतीने झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान -

बिहारमध्ये 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 71 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी मतदान झाले. याबरोबरच शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात मतदान होईल. तर, निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत, राजद हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Last Updated : Nov 6, 2020, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details