lalu yadav health update : लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, दिल्लीला हलवण्याची तयारी - लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची तब्येत सध्या ठिक नाही. त्यांना चांगल्या उपचारासाठी रांचीहून दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. रिम्सच्या वैद्यकीय मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जात आहे.
रांचीःआरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची तब्येत सध्या ठिक नाही. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांना चांगल्या उपचारासाठी रांचीहून दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. रिम्सच्या वैद्यकीय मंडळाच्या बैठकीत लालू यादव यांना दिल्लीला पाठवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. लालू यादव यांची क्रिएटिन लेव्हल वाढल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर माजी खासदार आर के राणा यांना दिल्लीला नेण्यास वैद्यकीय मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे.
Last Updated : Mar 22, 2022, 12:36 PM IST