मुंबईLalu Prasad Yadav on INDIA Alliance :राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी गुरुवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच त्यांनी इंडिया आघाडीचा भाग असलेल्या विरोधी पक्षांनी अहंकार सोडून एकत्र याव असं अवाहन देखील केलं. देशाची लोकशाही संविधान वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
मोदी सरकार अपयशी : "देशाचं रक्षण, गरिबी, वाढत्या महागाईविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांची स्थिती, देशातील बाढती बेरोजगारी, महिला आत्याचार मुद्यांवर विरोधकांनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे, असं लालू प्रसाद यादव म्हणाले. तसंच त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे.
निवडणुका एकत्र लढण्याची गरज : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय संविधान, लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला आपला अहंकार बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज आहे. 2024 लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याची गरज आहे, असं यादव म्हणाले.