पाटणा : राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव कित्येक वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. दिल्लीतील एम्समधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता आपली मुलगी मीसा भारतीच्या घरी आहेत. यानंतर आता लालू प्रसाद यादव यांनी कामाला सुरुवात केली असून, आज ते पक्षाच्या नेत्यांसोबच व्हर्चुअल बैठकीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
दुपारी दोनच्या सुमारास ही बैठक सुरू होईल. यामध्ये लालू प्रसाद यादव पक्षाच्या कित्येक नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये ते १४४ नेत्यांनी या गंभीर परिस्थितीमध्ये आपापल्या क्षेत्रात काय केले, आणि काय करणे अपेक्षित आहे याबाबत ते मार्गदर्शन करतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले तेजस्वी..