महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lalu Prasad health अचानक तब्येत बिघडल्याने लालू प्रसाद यादव दिल्ली एम्समध्ये दाखल - viral Video of RJD President

राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची रक्त तपासणी ( Lalu Prasad health check up ) करण्यात आली आहे. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. लालू प्रसाद यादव यांची तब्येत गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव

By

Published : Nov 26, 2021, 9:04 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना दिल्लीमधील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टांच्या माहितीनुसार त्यांना ताप आणि चक्कर येत आहे.

राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची रक्त तपासणी ( Lalu Prasad health check up ) करण्यात आली आहे. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. लालू प्रसाद यादव यांची तब्येत गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा-चारा घोटाळा प्रकरणात लालूंना जामीन? झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी

गेल्या तीन दिवसांपालून लालू प्रसाद यादवहे बिहारमध्ये आहेत. ते सीबीआय न्यायालयात हजर झाले होते. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यक्रमातही लालू प्रसाद यादव सहभागी झाले होते. जीप चालवित असतानाचा लालू प्रसाद यादव यांचा व्हिडिओ ( viral Video of RJD President ) व्हायरल झाला आहे.

हेही वाचा-दुमका कोषागार प्रकरण : लालूंना जामीन नाही; सहा आठवड्यानंतर होणार पुन्हा सुनावणी

पोटनिवडणुकीचा केला होता प्रचार

मागील वेळी बिहारमधील यात्रेदरम्यानही लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली होती. तब्येत बिघडल्याने त्यांना दिवाळीपूर्वी दिल्लीमध्ये यावे लागले होते. तेव्हाही लालू प्रसाद यादव यांनी 10 दिवस प्रवासांमध्ये पोटनिवडणुकीत प्रचार केला होता. तसेच रोज अनेक लोकांच्या भेटी सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा-लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू

जानेवारीमध्येही दिल्ली एम्समध्ये करण्यात आले होते दाखल-
लालू प्रसाद यादव यांची जानेवारी 2021 मध्ये प्रकृती ढासळली होती. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. हवाई रुग्णवाहिकेद्वारे त्यांना दिल्लीला आणण्यात आले होते. रांचीमधील रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला आणण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. चारा घोटाळा केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details