महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लखीमपूर हिंसाचार प्रकरण : काँग्रेसचे 'मौन व्रत', केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांना बडतर्फ करण्याची मागणी - लखीमपूर हिंसाचार प्रकरण

काँग्रेस सोमवारी देशभरात 'मौन व्रत' कार्यक्रम आयोजित करणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

लखीमपूर हिंसाचार प्रकरण
CONGRESS MAUN VRAT PROTEST

By

Published : Oct 11, 2021, 9:22 AM IST

नवी दिल्ली - लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेस सोमवारी देशभरात 'मौन व्रत' कार्यक्रम आयोजित करणार आहे. पक्षाच्या संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रदेश काँग्रेस समित्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, 11 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर सर्व राज्य मुख्यालयात सकाळी 10 ते 1 'मौन व्रत' पाळले जाईल.

काँग्रेसने या कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ नेते, खासदार, आमदार आणि फॉरवर्ड संस्था आणि विभाग प्रमुखांचा सहभाग सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. काँग्रेस लखीमपूर खेरी हिंसाचाराशी संबंधित सर्व आरोपींना अटक करण्याची आणि अजय मिश्रा यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेस करत आहे.

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचाराचा आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सुमारे साडे दहा तास त्याची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी आशिष मिश्राला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी 11 वाजता होणार आहे.

लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा आरोपी आशिष मिश्रा याला शनिवारी अटक करण्यात आली. आशिष हा लखीमपूरच्या टिकूनिया प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर 302, 304 ए, 147, 148, 149, 279, 120 बी यासह सर्व गंभीर कलमांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा -मोदीजी जगभर फिरतात, मात्र शेतकऱ्यांसाठी दिल्ली बॉर्डरपर्यंतही जात नाहीत; प्रियंका वाराणसीत गरजल्या

ABOUT THE AUTHOR

...view details