लखनौ- जिल्ह्यातील पालिया येथे नोकरी करत असलेल्या लाईनमनने पेटवून घेत आत्महत्या ( Lineman attempted to self immolation ) केली. बदलीसाठी एक लाखाची लाच आणि पत्नीला रात्रीसाठी द्या, अशी सहाय्यक अभियंत्याने मागणी केल्याचा आरोप या लाइनमनने केला होता. सहाय्यक अभियंत्याने पतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप लाईनमनच्या पत्नीने ( husband death to bribe in UP ) केला आहे.
लाईनमनच्या पतीने पलिया पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंत्याविरोधात तक्रार ( JE case in Palia police ) दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशासार, अधीक्षक अभियंता राम शब्द यांनी सहाय्यक अभियंता नागेंद्र शर्मा ( JE Nagendra Sharma suspended ) यांना निलंबित केले आहे. याशिवाय एका लाईनमनवरही कारवाई केली आहे. लाईनमनच्या आत्महत्येनंतर वीज महामंडळाच्या लाईनमन युनियनमध्ये संताप व्यक्त होत ( Lineman union in UP ) आहे.
खेरी जिल्ह्यातील भारत नेपाळ सीमेवरील धाहापूर येथे लाइनमन गोकुल यादव हे नोकरीला होते. त्यांची अलीगंज येथे बदली करण्यात आली. गोकुळ यांची चार मुले आणि पत्नी पलियामध्ये राहत होते. गोकुळ हे बदली करण्यासाठी चिंताग्रस्त होते. मात्र, सहाय्यक नागेंद्र शर्मा त्यांचे ऐकत नव्हते. दरम्यान, शनिवारी लाइनमन गोकुळ यांनी पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. गंभीरजखमी झालेल्या गोकुळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रविवारी त्याचा मृत्यू झाला.