मुंगेली ( छत्तीसगड ) : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. पण लग्नाच्या मोसमात एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे नावरदेवाकडच्या लोकांचा रुबाब आणि नखरे. असाच एक विवाह मुंगेलीत पाहायला (Laddu created a ruckus in marriage ) मिळाला. जिथे एका किरकोळ गोष्टीवरून नवरदेवाला राग आला आणि त्याने थेट लग्नाला नकार ( Groom refuses to marry in Mungeli ) दिला. मग काय, हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिस ठाण्यात लग्न न होण्याचे कारण सापडल्यावर पोलिसही चक्रावून गेले. अखेर मुलीकडच्यांची अवस्था पाहून पोलिसांनी ( Mungeli Kotwali Police ) संतापलेल्या नवरदेवाची समजूत घालून त्याला मंडपात बसवले.
असे आहे संपूर्ण प्रकरण : मुंगेली जिल्ह्यातील चारभाटा येथील रहिवासी रामभज साहू यांची मुलगी कुंती हिचा विवाह बेमेटारा येथे राहणारा गुणीराम साहू यांचा मुलगा सूरज साहू याच्याशी होत होता. बेमेटारा येथील मुर्ता गावातून मिरवणूक नियोजित वेळेवर पोहोचली. लग्नाचे सर्व विधी चालू होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व लोकांना भोजन दिले जात होते. वधूपक्षाने त्यांच्या क्षमतेनुसार सर्व व्यवस्था केली होती. वराकडील लोकांच्या जेवणाची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.