महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kuno Cheetah Update : पंतप्रधान मोदींनी नामकरण केलेली चित्ता 'आशा' गर्भवती? दोन महिन्यांनंतर होणार पुष्टी

श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमधून लवकरच चांगली बातमी मिळू शकते. नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्यांपैकी आशा ही गरोदर असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याची अधिकृत पुष्टी दोन महिन्यांनंतरच शक्य होणार आहे. कुनो नॅशनल पार्कचे व्यवस्थापक प्रकाश वर्मा यांनी सांगितले की, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

By

Published : Jan 29, 2023, 7:59 AM IST

Updated : Jan 29, 2023, 8:11 AM IST

Asha Cheetah Pregnant
आशा चित्ता गर्भवती

श्योपूर (मध्य प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्त्यांचे भारतात पुनर्वसन करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून, दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून भारतात आणलेल्या 8 चित्त्यांना वेगवेगळ्या बंदोबस्तात सोडण्यात आले आहे. या चित्त्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्याच बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. आता या चित्त्यांपैकी मादी चित्ता गरोदर असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, त्याची अधिकृत पुष्टी दोन महिने उलटल्यानंतरच शक्य होईल.

नामिबियातून आणलेले चित्ते :गेल्या वर्षीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले चित्ते सोडण्यात आले होते. तेव्हापासून संपूर्ण देशाच्या नजरा या चित्तांवर खिळल्या आहेत. क्वारंटाईन दरम्यान या चित्त्यांना स्वतंत्र बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. काही काळानंतर, दोन नर आणि तीन मादी चित्त्यांमधला गेट तीन आठवड्यांपूर्वी मोठ्या बंदोबस्तात उघडण्यात आले. यानंतर आता नर आणि मादी चित्ता एकमेकांच्या आवारात ये-जा करू शकतात.

मोदींनी ठेवले 'आशा' नाव : आता हे नर आणि मादी चित्ता भेटल्याचीही बातमी आली आहे. पण मादी चित्ता गर्भवती आहे की नाही, हे दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर कळेल. आशा असे या मादी चित्तेचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिला हे नाव दिले होते. 8 पैकी 7 चित्त्यांची नावे नामिबियामध्येच ठेवण्यात आली होती. तर एका चित्त्याचे नाव मोदींनी 'आशा' असे ठेवले होते.

सहवासाचा पुरावा नाही : श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कचे व्यवस्थापक प्रकाश वर्मा यांनी ईटीव्ही भारतला फोनवर सांगितले की, आशा मादी चित्ता खरोखर गर्भवती आहे की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. चीता टास्क फोर्सची नुकतीच बैठक झाली. त्यानंतर एक गेट उघडले गेले, जेणेकरून हे चित्ते एकमेकांमध्ये मिसळू शकतील. असे असतानाही त्यांचा सहवास झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

आणखी चित्ते येणार : गेल्या वर्षी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले होते. आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत साम्यंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार भारत दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणणार आहे. आगामी फेब्रुवारीच्या मध्यात हे चित्ते भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. नामिबियातील चित्त्यांप्रमाणेच हे चित्ते देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा :12 More Cheetahs To KNP : कुनोमध्ये फेब्रुवारीत येणार आणखी १२ चित्ते, भारत दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार

Last Updated : Jan 29, 2023, 8:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details