नवी दिल्ली -देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत प्राणघातक ठरत आहे. दररोज नवीन रुग्णांचा रेकॉर्ड होत आहेत. रविवारी संसर्गाची 2 लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाकुंभमधील विविध आखाड्यांच्या 100 हून अधिक संतांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सहा संतांनी कुंभ संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. कुंभात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाल्याच्या वृत्तानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यांकडून महाकुंभमधून परतलेल्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
दिल्ली -
हरिद्वार कुंभहून दिल्लीला येणार्या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा आदेश दिल्ली सरकारने जारी केला. त्याशिवाय 4 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यात जे उपस्थित होते, त्यांना आपली माहिती दिल्ली सरकारच्या www.delhi.gov.in वर 24 तासांच्या आत अपलोड करावी लागेल.
गुजरात -
अहमदाबाद कुंभात शाही स्नान करून गुजरातला परतणाऱ्यांना आरटी-पीसीआर तपासणीशिवाय प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नकारात्मक आढळल्यासच शहरात जाण्याची परवानगी दिली जाईल. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.