श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकक सुरू होती. यानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. हे दोनही दहशतवादी स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुटुंबीयांच्या आवाहनानंतर आत्मसमर्पण..
या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचा इशारा दिला. यासाठी त्यांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांचीही मदत घेतली. अखेर कुटुंबीयांच्या आवाहनानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. कुलगामच्या तोंगडौनू भागामध्ये ही चकमक घडली.