प्रयागराजShahi Eidgah Mosque :मथुरेतील शाही इदगाह संकुलाचं सर्वेक्षण होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय देताना शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळून लावलाय. कृष्णजन्मभूमी प्रकरणावर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयानं आमचा अर्ज स्वीकारला आहे. जिथं आम्ही शाही ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण करण्याची मागणी आयुक्तांकडं केली होती. या प्रकरणाची 18 डिसेंबर रोजी रूपरेषा ठरवली जाईल. न्यायालयानं शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळला आहे. त्यामुळं हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे.
काय आहे हिंदू पक्षाचा दावा? :अलाहाबाद हायकोर्टानं गुरुवारी श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणी आदेश देताना सांगितलं की, याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, भगवान श्री कृष्णाचं जन्मस्थान मशिदीच्या खाली आहे. आधी मशीद हिंदू मंदिर होतं, अशी अनेक चिन्हे इथे आहेत. याशिवाय मशिदीच्या खाली कमळाच्या आकाराचा स्तंभ, हिंदू देवतांपैकी एक 'शेषनाग'ची प्रतिमा देखील आहे. इतकंच नाही, तर मशिदीच्या खांबांच्या खालच्या भागात हिंदूची धार्मिक चिन्हे, कोरीवकाम असल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत सर्वेक्षणाच्या पद्धतींवर चर्चा केली जाईल, असं न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे.