पोलिसांनी दिली प्रतिक्रिया जयपूर: कोटामध्ये विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थ्यांवरील ताण-तणावाची समस्या पुन्हा चर्चेत आलीय. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या भावानं सध्याच्या परिस्थितीत कोटामध्ये शिक्षण घेता येणार नसल्याचं म्हटलयं. त्यामुळे हा विद्यार्थी बिहारमध्ये परतलाय. दुसरीकडे विद्यार्थी आदर्शने आत्महत्या केल्यानंतर त्याचे काका कोटामध्ये तातडीने दाखल झाले. आदर्शच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह त्याच्या काकांच्या ताब्यात दिलाय.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी तयारी करून घेणाऱ्या कोचिंग संस्थांमुळे कोटा हे शहर प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कोचिंग संस्थांमध्ये पुढील दोन महिने परीक्षांवर बंदी लागू करण्यात आलीय. तणावातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही, असे आदेश कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
तिन्ही मुले एकाच फ्लॅटमध्ये शिकत होती. अशा परिस्थितीत आदर्शने का आत्महत्या केली, याचे कारण त्याच्या भाऊ-बहिणीलादेखील समजले नाही. मग, इतरांना तर आत्महत्येचे काय कारण कळणार आहे?- आदर्शचे काका पप्पू सिंह
लातूरच्या विद्यार्थ्याची कोचिंग इन्स्टिट्यूटच्या आवारातच आत्महत्या- दुसरीकडे विज्ञान नगर पोलीस ठाण्याच्या अविष्कार या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यानं आत्महत्या केलीय. अविष्कार हा गेल्या २ वर्षांपासून कोटात वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होता. रविवारी झालेल्या परीक्षेत त्यालादेखील कमी गुण मिळाले. अविष्कार हा लातूर जिल्ह्यातील अहमदनगरचा रहिवाशी होता. अविष्कार हा तळवंडी येथे आजी-आजोबांसोबत राहत होता. त्यानं औद्योगिक परिसरातील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या आवारातच आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह मामानं ताब्यात घेतलाय.
शवविच्छेदनानंतर विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकणार आहे. मात्र, रविवारी विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यात कमी गुण मिळाल्यानेच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे- कुन्हडी पोलीस ठाण्याचे अधिकारी गंगासहय शर्मा
विद्यार्थ्यांची रविवारी परीक्षा का घेतली?-पोलीस अधिकारी गंगासहय शर्मा म्हणाले, विद्यार्थी राहत असलेल्या परिसराचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व इमारत मालकांना त्यामधील बदलासाठी निर्देश देण्यात येणार आहेत. कोटा शहराचे पोलीस अधीक्षक शरद चौधरी म्हणाले, सुट्टीच्या दिवशी परीक्षा घेणे ही कोचिंग संस्थेची चूक आहे. रविवारी परीक्षा का घेण्यात आली, याबाबतची कोचिंग संस्थेला विचारणा करण्यात आलीय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून दोषी आढळल्यास कोचिंग इन्स्टिट्यूट विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कोचिंग संस्थेकडून सांगण्यात आले की, अभ्यासात मागे पडलेल्या मुलांची रविवारी चाचणी घेतली जाते. कोचिंगमधील इतर मुलांना रविराी सुट्टी असते.
हेही वाचा-