रांची - मला माफ करा, मी आत्महत्या करत आहे. माझ्या सासरच्यांकडे येऊन मी चूक केली, सॉरी पापा, मी तुमचे ऐकले नाही, हे शब्द आहेत झारखंडमधील 21 वर्षीय कोमल पटेल या तरुणीचे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करून तिने गळफास घेत मृत्युला कवटाळलं. आत्महत्यापूर्वीचा कोमलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोमलला न्याय मिळावा अशी मागणी आता सोशल मीडियावरून होत आहे.
'मला माफ करा मी आत्महत्या करत आहे. आता मला सहन होत नाही. सासरच्यांकडे येऊन मी चूक केली, सॉरी पापा, मी तुमचे ऐकले नाही. मला वाटले की माझा नवरा सुधारला आहे. परंतु तो सुधारला नसून त्याने मला मारहाण केली, शिवीगाळ केली. तुम्ही माझ्या मुलाची काळजी घ्या आणि माझ्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा द्या, मला न्याय द्या नाहीतर मला मुक्ती नाही मिळणार, मला माफ करा, ही हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे कोमलने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.