महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED : 'डाव उलटला..', ईडीच्या अधिकाऱ्याचीच खंडणी प्रकरणात होणार चौकशी.. पोलिसांनी बजावली नोटीस - ईडीचे वरिष्ठ अधिकारी

देशभरातील घोटाळेबाजांना नोटिसा पाठवून चौकशीला बोलावणाऱ्या ईडीवर त्यांचाच डाव उलटला आहे. कोलकाता पोलिसांनी एका खंडणी प्रकरणात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. ( Kolkata Police issues notice ) ( senior ED official ) ( PIL for extortion scam )

ED
ईडी

By

Published : Aug 9, 2022, 3:28 PM IST

भुवनेश्वर ( ओडिशा ) : कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भुवनेश्वर येथील ईडीचे संचालक सुबोध कुमार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कुमार यांची 2016 ते 2022 दरम्यान रांची येथे नियुक्ती करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची ओडिशात बदली झाली होती. खंडणी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. ( Kolkata Police issues notice ) ( senior ED official ) ( PIL for extortion scam )

कोलकाता पोलिसांनी कथित जनहित याचिका-खंडणी घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे. याच प्रकरणात कोलकाता पोलिसांनी झारखंड येथील एका वकिलाला आधीच अटक केली आहे.

कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भुवनेश्वर येथील फेडरल एजन्सीचे संयुक्त संचालक सुबोध कुमार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कुमार यांची 2016 ते 2022 दरम्यान रांची येथे नियुक्ती करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची ओडिशात बदली झाली होती. कुमारची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांचे एक पथक मंगळवारी ओडिशातील भुवनेश्वर येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण अशावेळी आले आहे जेव्हा, केंद्रीय एजन्सी पश्चिम बंगालमधील कोट्यवधींच्या भरती घोटाळ्याची चौकशी करत आहे आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे.

हेही वाचा :WHAT IS ED : भल्या भल्यांना धडकी भरवणारी काय आहे 'ईडी'

ABOUT THE AUTHOR

...view details