KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: आयपीएलच्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून इडन गार्डन्सवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात 1 गडी गमावत 151 धावा करत सामना जिंकला. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने नाबाद 98 आणि कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 48 धावा केल्या.
KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: राजस्थान रॉयल्सने 5 षटकांनंतर धावसंख्या (68/1) पोहचली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने दिलेल्या अवघ्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात झाली आहे. 5 षटकांअखेर यशस्वी जैस्वाल (62), संजू सॅमसन (2) धावा करत क्रीजवर उपस्थित आहेत.
KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: यशस्वी जैस्वालने IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकून राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. जैस्वाल हा आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 13 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट:दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतांना जोस बटलर (0) आंद्रे रसेलच्या भयानक थ्रोवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सची 2 षटकांनंतर धावसंख्या (40/1) पोहचली आहे.
KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट:२० षटकांनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोअर (१४९/८)
KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट : प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 149 धावा केल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. केकेआरच्या चहलने सामन्यातील पहिली विकेट घेताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलच्या नावावर आता 143 सामन्यांत 187 विकेट्स आहेत, जे आयपीएलमध्ये कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स आहेत.
KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट : केकेआरचा कर्णधार नितीश राणा यांच्या नेतृत्वात चहल सामन्यातील पहिली विकेट घेताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलच्या नावावर आता 143 सामन्यांत 187 विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये इतर कोणत्याही गोलंदाजाने एव्हढ्या विकेट्स घेतलेल्या नाहीत.