महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

KKR vs RR IPL : कोलकाता नाईट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव - कोलकाता नाईट रायडर्सचा विजय

आयपीएलच्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव केला. राजस्थानने ठेवलेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केआर संघाने 5 चेंडू बाकी असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. (KKR defeated Rajasthan Royals) कोलकाताचा 10 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे तर राजस्थानचा 10 सामन्यांमधला चौथा पराभव आहे.

KKR vs RR IPL
KKR vs RR IPL

By

Published : May 3, 2022, 6:48 AM IST

नवी दिल्ली - सलग पाच पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा विजय खेचून आणला आहे. कोलकाताने राजस्थानवर सात गडी राखून शानदार विजय नोंदवला. ( KR scored 158 for 3 with five balls ) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने राजस्थानने दिलेले १५३ धावांचे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि पाच चेंडू शिल्लक असतानाच पुर्ण केले.

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत आयपीएलमधील चौथा विजय नोंदवला. राजस्थानने ठेवलेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने 5 चेंडू बाकी असताना 3 गडी गमावून 158 धावा केल्या. कोलकाताकडून विजयी षटकार नितीश राणाने लावला. (Chasing Rajasthan target of 153) नितीश 37 चेंडूत 48 धावा करून नाबाद परतला, तर रिंकूने 23 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या.


कोलकाता नाईट रायडर्ससाठी रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी चौथ्या विकेटसाठी 38 चेंडूत नाबाद 66 धावांची भागीदारी केली. रिंकूने 23 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. (KKR vs RR IPL) नितीश राणा 37 चेंडूत 48 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान, श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 34 धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी अनुक्रमे 25, 37 आणि 28 धावांत 1-1 बळी घेतला. आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सच्या फिरकीपटूंच्या खात्यात एकही विकेट आली नाही.


तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनने 49 चेंडूत 54 धावा केल्या. जोस बटलर 22 धावा करून बाद झाला. करुण नायर 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला तर रियान परागने 12 चेंडूत 19 धावा केल्या. शिमरन हेटमायरने 13 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला आणि अश्विनने 5 चेंडूत 6 धावा केल्या. (Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सकडून टीम साऊदीने 46 धावांत 2 बळी घेतले. उमेश यादव, अनुकुल राय आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.

या सामन्यासाठी श्रेयस अय्यरने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्याने व्यंकटेश अय्यरच्या जागी अनुकुल रॉयला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले. शिवम मावीचा राजस्थान रॉयल्सविरुद्धचा चांगला रेकॉर्ड लक्षात घेऊन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देण्यात आले. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने डॅरेल मिशेलच्या जागी करुण नायरला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.

हेही वाचा -Eid-ul-Fitr 2022 : रमजान ईद म्हणजे काय?; कशी साजरी करतात, वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details