संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) द्वारे दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन ( Non Violence Day 2022 ) साजरा केला जातो. तर जाणून घ्या आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचा इतिहास आणि महत्त्व. ( World Day of Non-Violence History )
जागतिक अहिंसा दिनाचा इतिहास ( World Day of Non-Violence History ) :15 जून 2007 च्या संयुक्त राष्ट्र महासभेचा ठरावात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ठरावाने जगभरात जागतिक अहिंसा दिन साजरा केला जाऊ लागला. 15 जून 2007 च्या महासभेत असे म्हटले होते की शिक्षणाच्या माध्यमातून अहिंसेचा व्यापक प्रसार केला जाईल. ठरावात असेही म्हटले आहे की अहिंसा आणि शांतता, सहिष्णुता आणि संस्कृतीच्या तत्त्वाची सार्वत्रिक प्रासंगिकता अहिंसेद्वारे संरक्षित केली गेली पाहिजे. संपूर्ण जगाने शांती आणि अहिंसेचे पालन करावे हा या दिवसाचा उद्देश आहे.