महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - लोणावळा एकविरा देवी यात्रा रद्द

लोणावळ्यातील एकविरा देवीची आजची चैत्री यात्रा रद्द, ऑक्सिजन एक्सप्रेस अशा महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे.

news today
news today

By

Published : Apr 19, 2021, 5:58 AM IST

नवी दिल्ली- दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

  1. भारतात लॉन्च होणार इनफिनिक्स

भारतात इन्फिनिक्स हॉट 10 प्ले हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. यात 6,000 mAh बॅटरी मिळू शकते. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी हा टेक ब्रँड परिचीत आहे.

इन्फिनिक्स स्मार्टफोन

2. दयाबेनची वापसी; ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांची घोषणा

तारक मेहताच्या निर्मात्यांनी ट्विटरद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. येत्या 19 एप्रिलपासून सोनी ये या किड्स वाहिनीवर सकाळी साडेअकरा वाजता सीरिज ब्रॉडकास्ट केली जाणार आहे. त्यामध्ये दयाबेन दिसणार आहे.

दयाबेन

3. लोणावळ्यातील एकविरा देवीची आजची चैत्री यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील एकविरा देवीची होणारी चैत्री यात्रा रद्द झाली आहे. मात्र, गडावर रिती रिवाजाप्रमाणे धार्मिक विधी होणार आहे. या महिन्यात होणारे पुढील काही सोहळेही रद्द होणार असल्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे.

एकविरा देवी यात्रा

4. राज्यातून ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी धावणार 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार

राज्यात कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी व ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. राज्यातून ऑक्सिजनचे दहा टँकर जाणार आहेत.

ऑक्सिजन एक्सप्रेस

5. नांदेडमध्ये ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनचे नियम आजपासून अधिक कडक

आजपासून 30 एप्रिलपर्यंत किराणा, भाजीपाला, भाजीमंडी, बेकरी, मिठाई घर सारखे अत्यावश्यक सेवा असणारे दुकाने हे सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंतच चालू राहणार आहेत. तर मेडिकल स्टोअर अथवा 24 तास सुरु राहणार आहेत. सदर वेळेनंतर फक्त होम डिलिव्हरीसाठीच मुभा असणार आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाही करणार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश दिले आहेत.

नांदेड लॉकडाऊन

6. बीड जिल्ह्यात उद्यापासून अत्यावश्‍यक सेवांसाठी कमी वेळ देण्यात आलेला आहे

बीडमध्ये आज जिल्हाधिकारी यांनी काढलेले नविन आदेशात किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी या दुकानांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. या दुकानांना सकाळी सात ते सकाळीपर्यंत सुट आहे. हातगाड्यावर फिरून फळांची विक्री सायंकाळी पाच ते सातपर्यंत विक्री करण्यात येणार आहे. या नियमांचे पालन आजपासून करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन

7. प्रियांका चोप्रा लाँच करणार कबीर बेदींचे आत्मचरित्र

अभिनेते कबीर बेदी हे गेल्या काही दिवसांपासून ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द अॅक्टर’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. प्रियांका चोप्रा कबीर बेदींचे आत्मचरित्र लाँच करणार आहे. कबीर यांच्या पुस्तकासाठी प्रियांका लंडनहून व्हर्चुअल पद्धतीने जोडली जाणार आहे. त्याचा प्रीमियर एका मनोरंजन पोर्टल आणि कबीर यांच्या सोशल मीडियावर 19 एप्रिलला संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.

प्रियांका चोप्रा

8. माजी मंत्री शिवतारेंचा आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा

पुणे- पुरंदर-हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नसल्यामुळे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत. गरज पडल्यास तिथेच ठिय्या मारण्याचा निर्णय शिवतारे यांनी जाहीर केला आहे. स्वतः किडनी पेशंट असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

विजय शिवतारे

9. गोकुळ निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज गोकुळ निवडणुकीबाबत सुनावणी होत आहे. या निर्णयानंतर दोन्ही पॅनेल व्युहरचना करण्याची शक्यता आहे. रविवारी दोन्ही आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरू होते.

गोकुळ

ABOUT THE AUTHOR

...view details