नवी दिल्ली -पंढरपूर मंगळवेढेमध्ये आज मतदान होत आहे. भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक मतदान आज होणार आहे.
१. कोरोनामुळे निरंजनी आणि आनंद आखाड्याकडून १७ एप्रिलला कुंभमेळा समाप्तीची घोषणा
हरिद्वार- कोरोना महामारीमुळे यंदाचा कुंभमेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसह साधुंना कोरोनाची लागण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर निरंजनी आणि आनंद आखाड्याने कुंभमेळा आज समाप्त होणार असल्याची घोषणा केली आहे. हा आखाडा परिषदेचा नव्हे तर वैयक्तिक निर्णय असल्याचेही या आखाड्यांनी स्पष्ट केले आहे.
२. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी आज मतदान होणार आहे. तर २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी तिरंगी लढत आहे.
३. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊन जोरदार प्रचार केला आहे भालकेंच्याविरोधात भाजपचे समाधान आवताडे रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे.
४. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचा अंदाज
पश्चिमी हिमालयीन क्षेत्रात पश्चिमी विक्षोभ उत्पन्न होत आहे. हा पश्चिमी विक्षोभ 14 एप्रिलपासून 17 एप्रिलपर्यंत वातावरणावर परिणाम करेल, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या तटीय क्षेत्रातही पावसाची शक्यता आहे.
५. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत आज मतदान