नवी दिल्ली-महाराष्ट्रातील टाळेबंदीचा आज पहिला दिवस आहे. दुसरीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत असताना पाऊस होणार असल्याने महाराष्ट्रात चिंता वाढली आहे.
1. महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज
मुंबई - प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
2. मंगळवेढा मतदारसंघात प्रचाराचा आज शेवटचा दिवस
सोलापूर - पंढरपूरमंगळवेढा मतदारसंघात 15 एप्रिलपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. या मतदारसंघात 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणीच्या होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
मंगळवेढा विधानसभा निवडणूक प्रचार 3. इग्नुमध्ये प्रवेश घेण्याचा आज शेवटचा दिवस
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जानेवारी सत्राच्या विविध यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. विद्यार्था 15 एप्रिलपर्यंत विविध अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ 4. शेवगाव शाखेतील 364 सोनेतारण कर्ज पिशव्यांचे लिलाव होणार
अहमदनगर- नगर अर्बन बँकेतील 3 कोटीचा चिल्लर घोटाळा व पिंपरी-चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. 15 एप्रिलला या बँकेच्या नगर येथील मुख्य कार्यालयात शेवगाव शाखेतील त्या बहुचर्चित 364 सोनेतारण कर्ज पिशव्यांचे लिलाव होणार आहेत. ते होण्याआधी या पिशव्या उघडून त्यातील तारण सोन्याची तपासणी होणार आहे. काही संशयास्पद आढळले तर संबंधित कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची तयारी बँक प्रशासनाने ठेवली आहे.
5- राजस्थानशी दिल्लीचा सामना
राजस्थानचा आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये सामना आहे. आयपीएलच्या रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.
6. कोरोना लसीचा साठा मुंबईत येण्याची शक्यता
मुंबई - कोरोना लसीचा पुढचा साठा आज येणार आहे. तो साठाही अपुराच पडण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या 108 लसीकरण केंद्र आहेत. तर दिवसाला सरासरी 50 हजार नागरिकांना लस दिली जाते.
7. Asus ROG Phone 5 चा पहिला ऑनलाईन सेल
मुंबई - Asus ROG Phone 5 चा पहिला ऑनलाईन सेल आज आहे. या गेमिंग स्मार्टफोनच्या सेलची घोषणा कंपनीने अधिकृत वेबसाईटवरुन केली आहे. या सेलअंतर्गत गेमिंग स्मार्टफोनवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच 6000 ते 16500 रुपयांपर्यंतची सूट एक्सचेंज ऑफर्सच्या माध्यमातून मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
8. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आजपासून बंद
चंद्रपूर- महाराष्ट्र शासनाने मंगळवारी जारी केलेल्या '' ब्रेक द चेन '' निर्देशानुसार, गुरुवारपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आणि बफर मधील सर्व उपक्रम बंद राहणार आहेत. 15 एप्रिलपासून ते 30 एप्रिल 2021 पर्यंत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
9. आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर
मुंबई- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी आरटीई सोडत बुधवारी जाहीर झाली. येत्या 15 एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविली जाणार आहे. प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
10. टाळेबंदीचा आज पहिला दिवस
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या टाळेबंदीचा आज पहिला दिवस आहे. राज्यात 144 कलम लागू झाल्याने गर्दी करण्यास मनाई असणार आहे. बिगर जीवनावश्यक वस्तुंची खरेदी-विक्री आणि विनानकारण प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.