महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karwa Chauth 2022: जाणून घ्या, करवा चौथला सरगीच्या ताटात कोण-कोणत्या गोष्टी ठेवाव्या? - करवा चौथ 2022

करवा चौथ व्रतामध्ये (Karwa Chauth) सरगीच्या थाळीला (Sargi Thali) विशेष महत्त्व आहे. अशा वेळी करवा चौथच्या दिवशी सरगीच्या ताटात कोण-कोणत्या गोष्टी ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया..

Karwa Chauth 2022
Karwa Chauth 2022

By

Published : Oct 12, 2022, 12:07 PM IST

Updated : Oct 13, 2022, 7:13 AM IST

नवी दिल्ली: कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी 13 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी देशभरात करवा चौथचा (Karwa Chauth)उपवास ठेवला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास करतात. तसेच या काळात उपवास करणाऱ्या महिला करवा माता, भगवान शिव, माता पार्वती आणि चंद्रदेव यांची पूजा करतात. करवा चौथच्या दिवशी उपवास करणारी सासू तिच्या सुनेला सरगी अर्पण करते (Sargi Thali). सरगीशिवाय करवा चौथचे निर्जला व्रत अपूर्ण राहते, असे मानले जाते. अशा वेळी करवा चौथच्या दिवशी सरगीच्या ताटात कोण-कोणत्या गोष्टी ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया..

सरगीचे ताट:करवा चौथच्या आधी सासू व्रत करणाऱ्या सूनेला सरगीचे ताट देतात. यामध्ये मिठाई आणि खाद्यपदार्थ असतात. सरगीच्या ताटात प्रामुख्याने श्रृंगार, फळे, मिठाई आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी 16 वस्तू असतात. उपवासाची सुरुवात सरगीच्या ताटापासून होते अशी मान्यता आहे. जर व्रत करणाऱ्या महिलेची सासू नसेल तर तिची वहिनी किंवा मोठी बहीण हा विधी करू शकतात. सरगीच्या ताटातकुंकू, टिकली, मेंदी, पैंजण, काचेच्या बांगड्या, लाल साडी, गजरा, सिंदूर, महावर, काजळ, कंगवा इत्यादी वस्तूंचा समावेश केला जातो. याशिवाय ताज्या फळांचाही सरगीच्या ताटात समावेश असतो. सरगीच्या ताटात सुका मेवा आणि मिठाईचाही समावेश असावा.

सरगीचा शुभ मुहूर्त: करवा चौथ व्रताच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सरगी विधी केला जातो. करवा चौथच्या दिवशी पहाटे ४-५ च्या दरम्यान सारंग करणे योग्य राहील. सरगीच्या वेळी तेल-मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. असे मानले जाते की असे केल्याने हे व्रत शुभ फल देत नाही. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर सरगीचे सेवन करणे चांगले असते. ब्रह्म मुहूर्त - 13 ऑक्टोबर, सकाळी 04:46 ते 05:36 पर्यंत आहे.

Last Updated : Oct 13, 2022, 7:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details