महाराष्ट्र

maharashtra

Todays Top News in Marathi: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार सुरू; 'या' महत्त्वाच्या घडामोडीवर राहणार नजर

By

Published : Dec 22, 2021, 5:09 AM IST

आजच्या काही ठळक घडामोडीमध्ये न्यायालयातील काही सुनावणी आहेत. तसेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची ( Winter Session 2021 ) सुरुवात आहे. राज्यभरातील एक लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष बुधवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे असणार आहे. दुसरीकडे एसटीच्या विलनीकरणावर ठाम राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने शेवटचा ( Ultimate to ST employees by gov ) अल्टीमेट दिला आहे.

Top news in marathi
Top news in marathi

नवी दिल्ली- महाराष्ट्रात न सुटलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर तरुणांना व मुलांना शिकण्याची प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रीय गणित दिन साजरा होत आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडींसह काल (२१ डिसेंबर ) रोजी घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढाव व भविष्यावरही नजर राहणार आहे.

22 डिसेंबरला या महत्त्वाच्या घडामोडींवर राहणार नजर

हिवाळी अधिवेशन आजपासून होणार सुरू ( to begin winter session in Maharashtra )

मुंबई - 22 डिसेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session 2021 ) पार्श्वभूमीवर विधानभवनात ( Vidhan Bhavan ) प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह ( 8 People Tested Positive for RT-PCR ) आली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी ( Vidhan Bhavan Entrance ) बंधनकारक करण्यात आली असून अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. एकूण 2678जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. सविस्तर वाचा-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर न्यायालयात सुनावणी

मुंबई- एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाचा ( ST Workers Strike) अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमली असून आज या समितीचा प्राथमिक अहवाल न्यायालयासमोर सादर ( Mumbai High Court on ST Strike ) करण्यात आला. एसटीच्या संपावर 22 डिसेंबर 2021 ला सुनावणी होणार आहे. यामुळे आता राज्यभरातील एक लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे ( Mumbai High Court hearing on merger of ST ) लागले आहे. सविस्तर वाचा-

राष्ट्रीय गणित दिन साजरा-

हैदराबाद - देशभरात 22 डिसेंबर हा दिन 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांचे गणित क्षेत्रातील थोर कार्याची आठवण म्हणून 'राष्ट्रीय गणित दिन' ( National Mathematics Day ) म्हणून साजरा केला जातो. सविस्तर वाचा-

22 डिसेंबरची मतमोजणी 19 जानेवारीला ढकलली-

राज्यातील 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक‍ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. आज सरासरी 76 टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के, तसेच महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 38 टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित केलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी आज मतदान झाले. तर या सर्व जागांसाठीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे. सविस्तर वाचा-

ऋषिकेश देशमुख यांच्या जामिन अर्जावर सुनावणी-

100 कोटी कथित वसुलीप्रकरणी ( 100 Crore Recovery Case ) ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली ( ED Notice Rishikesh Deshmukh ) होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांनी ईडी कार्यालयात न जाता मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये ( Mumbai Special Court ) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी (दि.17 ) रोजी सुनावणी झाली. ऋषिकेश देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी ( Adv Vikram Caudhari ) यांनी बाजू मांडली. मात्र, तरीदेखील न्यायालयाने दिलासा दिला नसून ( Rishikesh Deshmukh Not Relieved ), पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

सविस्तर वाचा-

21 डिसेंबरच्या 5 महत्त्वाच्या बातम्या-

1) 20 यूट्यूब चॅनल्सवर ( You Tube channels ban ) बंदी

नवी दिल्ली -भारत विरोधी एजेंडा चालवण्याच्या आरोपाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 20 यूट्यूब चॅनल्सवर ( You Tube channels ban ) बंदी घातली आहे. तसेच, मंत्रालयाने 2 वेबसाईट्सवर कारवाई देखील केली आहे. भारतीय गुप्तचर संस्था आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी आधी या चॅनेल आणि साईट्सची ओळख पटवण्यात आली. सरकारने बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेलमध्ये द पंच लाइन, इंटरनॅशनल वेब न्यूज, खालसा टीव्ही, द नेकेड ट्रूथ अशा चॅनेलचा समावेश आहे. सविस्तर वाचा-

2) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC साठी 27% आरक्षण रद्द (Struck down 27% reservation) केले. केंद्र सरकार सर्व संबंधितांचे मत विचारात घेऊन या समस्येचे संपूर्णपणे परीक्षण करत असल्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा

3) निलंबित कर्मचाऱ्यांकरिता दिलासा देणारा जीआर

मुंबई - एसटीच्या विलनीकरणावर ठाम राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने शेवटचा ( Ultimate to ST employees by gov ) अल्टीमेट दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपर्यंत सेवेत रुजू व्हावे. नियोजित वेळेत दाखल झाल्यास त्यांच्यावर आतापर्यंत केलेली कारवाई तात्काळ मागे घेतली जाईल, असे परिपत्रक राज्य सरकारने ( MH GR for ST employees ) काढले आहे. सविस्तर वाचा-

4) Keshav Upadhye Critisize Nawab Malik : 'परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी नवाब मलिकांचा संबंध, अधिवेशनात पुढे येईल'

मुंबई -सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसाठी घेण्यात ( Maharashtra Exam Scam ) येणाऱ्या परीक्षांमध्ये झालेले घोळ, गैरप्रकार हे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच घडले आहेत. परीक्षांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराशी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Relation With Exam Scam ) यांचा असलेला संबंध विधिमंडळाच्या याच अधिवेशनात ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) भाजपाचे लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी सिद्ध करतील, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP Leader Keshav Upadhye PC ) यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा-

5) MHADA And TET Exam Scam : 'अशी' करण्यात आली 25 आरोपींना अटक

पुणे -राज्यात एमपीएससी, आरोग्य विभाग, म्हाडा ( MPSC, Department of Health, MHADA And TET Exam Scam ) आणि आता टीईटी परिक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत 25 आरोपींना अटक ( 25 Accused Arrested ) केली आहे. हा संपूर्ण जाळ अधिक मोठ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची सुरुवात कशी झाली? पोलिसांनी कशी कारवाई केली. याबाबत पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे ( Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shiswe ) यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली आहे. सविस्तर वाचा-

जाणून घ्या, आजचा दिवस कसा असेल? ( 22 December 2021 Rashibhavishya )

VIDEO : 22 December Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope 2022 Taurus : वृषभ राशीसाठी 2022 हे वर्ष कसं असेल, जाणून घ्या

22 December Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज विविध क्षेत्रात धनलाभ होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aajchi Prerna : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

ABOUT THE AUTHOR

...view details