नवी दिल्ली- देश कोरोनाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा आज गाठणार आहे. या लसीकरणाची राज्यातही सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे पुढे ढकलेला गोवा फेस्टिव्हल आजपासून सुरू होत आहे. अशा महत्त्वाच्या घटनांचा वेध घेतला आहे.
1. कोरोना लसीकरण मोहीमेची आज देशभरात सुरुवात
नवी दिल्ली- देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी 10.30 वाजता विलेपार्लेतल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदी आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात करत आहेत. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. कोरोना लसीकरणासाठी देशभरात २ हजार ९३४ बुथ सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यातील काही लाभार्थ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. आज देशातील सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.
२. पंतप्रधानांचा स्टार्टअप्शी संवाद
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आहेत आणि 'प्रारंभ' या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्सच्या शिखर परीषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. ही परीषद वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने येत्या 15-16 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली आहे. ऑगस्ट 2019 ला काठमांडू येथे झालेल्या चौथ्या बिमस्टेक परीषदेत पंतप्रधानांनी बिमस्टेक स्टार्ट अप्स कॉनक्लेव्हचे यजमानपद भूषविण्याचे जाहीर केले होते. या घोषणेचा पाठपुरावा करण्यासाठी ही दोन दिवसीय परीषद आयोजित करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्ट अप उपक्रमाचा आरंभ केला होता त्याचा हा पाचवा वर्धापनदिन आहे.
३. राज्यात काँग्रेस राजभवनला घालणार घेराव
मुंबई - केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील 50 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आज ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
४. गोवा फिल्म फेस्टीवल आजपासून सुरू
नवी दिल्ली –गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साजरा होत असतो. मात्र यंदा कोविड-19 च्या जागतिक महामारीने हा 51 वा फिल्म फेस्टीवल 16 ते 24 जानेवारी अशा नऊ दिवसांत पणजी येथे साजरा केला जाणार आहे. केंद्रिय माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निवडक प्रेक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ आणि समारोपाचे कार्यक्रम होणार आहे. तर बहुतांश चित्रपट हे ऑनलाईन प्रदर्शित होणार आहेत.
५. ओपोचा नवा स्मार्टफोन होणार लाँच