महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vitamin C : व्हिटॅमिन 'सी’ ची कमतरता असल्यास शरीरात होतात हे गंभीर बदल - Benefits And Side Effects

व्हिटॅमिन 'सी’ म्हणजे 'क' जीवनसत्व (Vitamin C) होय. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात 'क' जीवनसत्व जाणं गरजेचं आहे. 'क' जीवनसत्वाचे फायदे काय? आणि त्याची शरीरात कमतरता असल्यास कसं ओळखावं, कोणत्या भाजीत किंवा फळांमध्ये 'क' जीवनसत्व असते, ते किती प्रमाणात असतं, याबाबत (Vitamin C Benefits And Side Effects) सविस्तर जाणून घ्या.

Vitamin C
'क' जीवनसत्व

By

Published : Sep 21, 2022, 4:07 PM IST

'क' जीवनसत्त्व (Vitamin C) मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरूपात आढळते. हे विविध पदार्थांमध्ये आढळणारे आणि आहारातील पूरक म्हणून विरले जाणारे जीवनसत्त्व आहे. 'क' जीवनसत्त्व हे स्कर्वीला प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी वापरले जाते. व्हिटॅमिन सी हे ऊतकांच्या दुरुस्तीमध्ये, कोलेजनची निर्मिती आणि विशिष्ट न्यूरोट्रांसमीटरच्या एन्झाईमॅटिक उत्पादनामध्ये आवश्यक असलेले पोषक द्रव्य देखील आहे.(Vitamin C Benefits And Side Effects)

'क' जीवनसत्वाचे फायदे : रोगप्रतिकार शक्ती उत्तम असली तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. 'क' जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. 'क' जीवनसत्वामुळे पचनशक्ती सुरळीतपणे पार पडते. 'क' जीवनसत्वामुळे शरीराला अँटी ऑक्सिडेंट पुरेशा प्रमाणात मिळतात. रक्तदाब नियंत्रणात येतं. तसेच रक्त वाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतं. शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करून हृदयासंबधित आजारांचा धोका कमी करतं. शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्याचं काम 'क' जीवनसत्व करतं. तसंच गाठी असल्यास त्या कमी करण्यासही क जीवनसत्व मदत करतं. लोहाचं प्रमाण कमी असल्यास 'क' जीवनसत्वामुळे ती कमरता भरून निघते. तसंच अन्नपदार्थातून लोह शोषण्यास मदत करतं.

कमतरतेमुळे होणारे आजार :'क' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. केस गळतात.

अधिक सेवनाचे दुष्परिणाम : संच 'क' जीवनसत्वाचं जास्त प्रमाणात सेवन होणे देखील शरीराचं नुकसान करण्यास कारणीभूत ठरतं. 'क' जीवनसत्वाचं प्रमाण जास्त झाल्यास किडनी स्टोन, पोटात जळजळ, जुलाब अशी लक्षणं दिसून येतात. 'क' जीवनसत्व पाण्यात विरघळून जातं. त्यामुळे शरीरात साठत नाही. म्हणून दररोज शरीरात आवश्यक प्रमाणात 'क' जीवनसत्व जाणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज ६५-९० ग्रॅम 'क' जीवनसत्वाचं सेवन करणं आवश्यक आहे.

​१०० ग्रॅममध्ये किती प्रमाणात असतं 'क' जीवनसत्व? : फळं आणि भाज्यांमधून 'क' जीवनसत्व पोटात जाणं गरजेचं आहे. आवळा हे 'क' जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. जाणुन घेऊया 100 ग्रॅम मध्ये किती प्रमाणात, कोणत्या भाज्यांमध्ये असतं, 'क' जीवनसत्व.

आवळा- ५०० ते ६०० एमजी (चार ते पाच आवळे), पेरु- २२० एमजी (एक मोठं किंवा दोन छोटी फळं) ,पालक- १३० एमजी, सिमला मिरची- १२५ एमजी (एक किंवा दोन), कीवी- ९३ एमजी (दोन किंवा तीन किवी), ब्रोकोली- ९० एमजी

या ​फळभाज्यांचे करा सेवन :लिची- ७१.५ एमजी (दोन ते तीन लिची), स्प्राऊट्स- ६० ते ८० एमजी, पपई- ६० एमजी, स्ट्रॉबेरी- ५९ एमजी, संत्र- ५५ एमजी, लिंबू- ५३ एमजी, अननस- ४७. ८ एमजी, डाळी- ३५ ते ४० एमजी, आंबा- ३५ एमजी, कैरी- २७. ७ एमजी, टोमॅटो- २५ एमजी, बटाटा- १९. ७ एमजी, जांभळं- १४. ३ एमजी (नऊ ते दहा जांभळं), कांदा- १३.७ एमजी

​वयोमानानुसार 'क' जीवनसत्वाची आवश्यकता :जन्म ते ६ महिने- ४० एमजी, ७ ते १२ महीने- ५० एमजी, १ ते ३ वर्षं- १५ एमजी, ४ ते ८ वर्षं- २५ एमजी, ९ ते १३ वर्षं- ४५ एमजी, १४ ते १८ वर्षं (मुलं)- ७५ एमजी, १४ ते १८ वर्षं (मुली)- ६५ एमजी, १९ वर्षांपेक्षा जास्त (मुलं)- ९० एमजी, १९ वर्षांपेक्षा जास्त (मुली)- ७५ एमजी. (Vitamin C Benefits And Side Effects)

ABOUT THE AUTHOR

...view details