हैदराबाद - 26 नोव्हेंबर 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष म्हणून भारत सरकारने प्रथमच संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी राष्ट्रीय विधी दिवस म्हणून साजरा केला जात होता. 1949 साली याच दिवशी भारताचे संविधान हे संविधान सभेत मंजूर करण्यात आली होती. संविधानाचा स्वीकार करून भारताला 71 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाची महत्त्वाची दहा वैशिष्ट्ये जाणून घेऊया
- सर्वात मोठे लिखीत संविधान (Lengthiest Written Constitution)
संविधानाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे लिखीत (उदा. अमेरिकेचे संविधान) आणि दुसरा म्हणजे अलिखीत (उदा. ब्रिटीश संविधान), भारतीय संविधान हे लिखीत प्रकारातील सर्वात मोठे संविधान आहे. हे आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट आहे. ते एकप्रकारे अतिशय व्यापक, विस्तृत आणि तपशिलवार असं एक महत्तवाचं दस्ताऐवज आहे. सद्यस्थितीत संविधानात एक प्रास्ताविका, 470 कलमे आणि 12 परिषिष्ठ असून ती 25 भागांमध्ये विभागली आहेत. तसेच संविधानात आतापर्यंत 105 दुरुस्ती देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुळ संविधान जेव्हा लागू करण्यात आलं होते. तेव्हा यात एक प्रास्ताविका, 395 कलमे आणि 8 परिषिष्ठे होती.
मुळात हे संविधान इतकं मोठं तयार करण्याची चार महत्त्वाची कारणे होती. पहिले कारण म्हणजे देशातचा भौगोलिक विस्तार आणि विविधता, दुसरं कारण म्हणजे संविधानावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935 चा प्रचंड प्रभाव होता. तिसरं कारण म्हणजे केंद्र आणि राज्यांसाठी एकच संविधान असावं आणि चौथं कारण म्हणजे संविधानावर कायदेपंडीतांचं वर्चस्व, या कारणांमुळे सर्वात मोठे लिखीत संविधान तयार करण्यात आलं होते.
- विविध देशातील संविधांनापासून तयार झालेले संविधान ( Drawn From Various Sources)
भारतीय संविधान तयार करत असताना जगातील अनेक संविधानाचा अभ्यास करण्यात आला होता. त्यांच्या संविधानातील काही तरतुदी जशाच्या तशा घेण्यात आल्या, तर काही तुरतदींमध्ये भारतील परिस्थितीप्रमाणे अनेक बदलही करण्यात आले.
- कठोर आणि लवचिकता याचे मिश्रण ( Drawn From Various Sources)
संविधानाचे कठोर आणि लवचिकता अशा दोन भागात वर्गीकरण केले जाते. कठोर संविधानांध्ये कायद्यातील सुधारणा करण्यासाठी विशेष पद्धतीची आवश्यता असते. तर लवचिक संविधानांमध्ये कायद्यातील सुधारणा या साध्या पद्धतीने केल्या जातात. भारतीय संविधान हे कठोर आणि लवचिकता याचे मिश्रण आहे. कलम 368 नुसार कायद्यातील सुधारणा करण्यासाठी दोन प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. काही सुधारणा या सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या बहुमताने केल्या जातात. तर काही सुधारणांसाठी दोन्ही सभागृहातील उपस्थित सदस्याच्या बहुमतासह राज्यांच्या बहुमताचा देखील विचार केला जातो.
- संसदीय शासनपद्धती (Parliamentary Form of Government)
भारताने ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे. जेणे करून कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात सहकार्य आणि समन्वय राखता येईल.
- एकेरी नागरिकत्व (Single citizenship)