नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC topper interview by ETV Bharat ) ने सोमवारी नागरी सेवा परीक्षा-2021 चा निकाल जाहीर ( UPSC 2021 result ) केला. यामध्ये श्रुती शर्मा प्रथम आली ( Interview of UPSC Topper Shruti Sharma ) आहे. ईटीव्ही भारतने तिची विशेष मुलाखत घेतली आहे.
सुमारे ६८५ उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले ( Public Service Commission on result ) आहे. मात्र, आयोगाने याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आयोगाने म्हटले आहे की श्रुती शर्मा प्रथम तर अंकिता अग्रवाल ( Ankita Agarwal in UPSC ) आणि गामिनी सिंगला ( Gamini Singla in UPSC ) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.
जामिया मिलिया इस्लामियाच्या अकादमीमधून घेतले शिक्षण-श्रुती शर्मा हिने यूपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रुती शर्माने जामिया मिलिया इस्लामियाच्या निवासी कोचिंग अकादमीमधून ( Academy of Jamia Millia Islamia ) शिक्षण घेतले आहे. श्रुती शर्माने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी ( Shruti Sharma Etv Bharat interview ) संवाद साधला. यामध्ये तिने यशाचे गमक तसेच विद्यापीठात शिकत असतानाचे अनुभव सांगितले. यशाचे सर्व विक्रम मोडले. तिच्या पालकांना अभिमान वाटावा, अशी तिने कामगिरी केली.