महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारगिल युद्धातील परमवीर चक्र प्राप्त शूर सैनिकांची थरारक कहाणी - कारगिल युद्ध न्यूज

कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारणाऱ्या जवान, अधिकारी आणि विविध रँकवरील सैनिक यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. या सर्वांच्या शौर्याबद्दल भारत सरकारने परमवीर च्रक देऊन गौरव केला आहे.

कारगिल युद्धातील परमवीर चक्र
कारगिल युद्धातील परमवीर चक्र

By

Published : Jul 26, 2021, 3:57 AM IST

Updated : Jul 26, 2021, 7:25 AM IST

हैदराबाद -भारतीय सेनेतील युवा अधिकारी आणि सैनिकांनी कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली. भारतीय जवानांचे शौर्य, धैर्य और दृढ़ संकल्पाचे दर्शन कारगिल युद्धात झाले. सैनिकांनी देशासाठी जीवन अर्पण करत पाकिस्तानचा पराभव केला.

कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारणाऱ्या जवान, अधिकारी आणि विविध रँकवरील सैनिक यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. या सर्वांच्या शौर्याबद्दल भारत सरकारने परमवीर च्रक देऊन गौरव केला आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा-पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू, तर 64 जण अद्यापही बेपत्ता

ग्रेनेडियर योगिंद्र सिंह

ग्रेनेडियर योगिंद्र सिंह यादव यांनी द टायगर हिल परत मिळवण्यात मोलाची कामगिरी केली. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना 3/4 जुलै 1999 च्या रात्री टायगर हिल वर ताबा घेण्यास सांगण्यात आले. 16500 फुट उंचावरील टायगर हिल वर योगेंद्र सिंह यादव चढाई केली. त्यांचे सहकारी पोहोचताच शत्रू सैन्याने आक्रमण केले. यामध्ये यादव यांचे दोन सहकारी मारले गेले. यांनतर योगेंद्र सिंह यांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. यानंतर त्यानी ग्रेनेडने पाकिस्तानी बंकर उद्धवस्त केले. योगेंद्र सिंह यांना गोळ्या लागल्या त्यांनी 4 पाकिस्तानी सैनिकांना मारले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या.

हेही वाचा-KARGIL VIJAY DIWAS द्रासमध्ये शहीद जवानांचे स्मरण; विविध कार्यक्रमांचे आयोजन

रायफलमन संजय कुमार

4 जुलै 1999 रोजी मशकोह दरीतील पॉईंट 4875 वरिल टॉप एरिया परत मिळवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. संजय कुमार यांनी टीमचे नेतृत्व केले. कुमार यांनी तीन पाकिस्तानी सैनिकांना मारले यात तेही जखमी झाले. जखमी होऊनही संजयकुमार यांनी पाकिस्तानी बंकर्सवर हल्ला केला. संजयकुमार जखमी झाल्यामुळे रक्तश्राव होत असूनही ते मागे हटले नाहीत त्यांनी केलेल्या शौर्यामुळे 4875 वरील टॉप एरिया भारताने परत मिळवला. भारत सरकारने त्यांना परमवीर चक्र देऊन गौरव केला.

हेही वाचा-KARGIL VIJAY DIWAS जाणून घ्या, ऑपरेशन विजयमधील वीर जवानांची शौर्यगाथा

कॅप्टन विक्रम बात्रा

7 जुलै 1999 च्या दिवशी कॅप्टन विक्रम बात्रा यांनी पॉईंट 4875 यांनी उत्तर भाग परत मिळवण्यासाठीच्या मोहिमेचे नेतृत्व केले. पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार सुरु होता. त्यावेळी एका विक्रम बात्रा यांनी पॉईंट ब्लॉक रेंजमध्ये पाकच्या सैन्याला व्यस्त केले. यामध्ये विक्रम बात्रा जखमी झाले पण त्यांनी माघार घेतली नाही. बात्रा आणि त्यांच्या साथीदारांनी पराक्रम गाजवत अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. 20 जून 1999 रोजी विक्रम बात्रा यांना वीरमरण आले. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले. विक्रम बात्रा यांनी मोहिमेवर जाताना घोषणा केली होती. "या तो मैं तिरंगा फहराने के बाद वापस आऊंगा, या मैं उसमें लिपटा हुआ वापस आऊंगा, लेकिन मैं वापस आऊंगा- ये दिल मांगे मोर"ही घोषणा नंतर खूप प्रसिद्ध झाली.

लेफ्टनंट मनोज कुमार पांडे

1/11 गोरखा रायफल्स चे युवा अधिकारी लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांनी शौर्य गाजवले. 2-3 जुलै 1999 च्या रात्री अवघड असणारी मोहीम पूर्ण केली. दुश्मन सैन्याच्या गोळ्यांच्या सामना मनोज कुमार पांडे यांना करावा लागला. मनोज कुमार यांनी भारतीय सैन्यावर हल्ला करणारे चार पाकिस्तनाी बंकर उद्धवस्त केले. त्यांनी दोन सैनिकांना मारले. तिसऱ्या बंकरवर हल्ला करताना त्यांच्या खांद्यावर गोळी लागली. जखमी होऊनही त्यांनी चौथा बंकर उद्धवस्त केला. युवा अधिकारी मनोज कुमार यांच्या शौर्यामुळे त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

Last Updated : Jul 26, 2021, 7:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details