महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा, आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी - Sharad Pawar Purandar Visit Today

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा.

Top News Today
दिवसभरातील ठळक घडामोडी

By

Published : Oct 24, 2022, 7:12 AM IST

मुंबई :आजच्या दिवसभरातीलमहत्त्वाच्या घडामोडींचाथोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज लक्ष्मीपूजन, शिंदे गट आणि ठाकरे गटाचा दिवाळी पहाट कार्यक्रम , शरद पवारांचा आज पुरंदरच्या दौरा या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आहेत.

आज लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) : दिवाळीच्या सांयकाळी म्हणजे आज लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेराच्या पुजेचा मान असतो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू होत आहे. तर 25 ऑक्टोबर सांयकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार होईल.

पंतप्रधान आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता ( PM Modi ) :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात, अशी शक्यता आहे. कारण विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी गेल्या 8 वर्षांपासून सैनिकांमध्ये दिवाळीचा सण साजरा करत आहेत.

शिंदे गट आणि ठाकरे गटाचा दिवाळी पहाट कार्यक्रम ( Diwali 2022 ) : आज सकाळी तलावपाळी येथे शिंदे गटातील युवासेनेकडून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जागी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने, राजन विचारे यांनी आपला कार्यक्रम त्याच्याच थोडा पुढे आयोजित केलेला आहे. तर राजन विचारे यांच्या पुढे चिंतामणी चौकात शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला आहे.दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाईल, अशी शक्यता आहे.

आज जागितक पोलिओ दिवस (World Polio Day)-आज जागतिक पोलिओ दिवस आहे. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ लसीचे जनक जोनस साल्क यांच्या स्मरणार्थ या दिनाची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पोलिओ रविवार साजरे केले जातात.

शरद पवारांचा आज पुरंदरच्या दौरा (Sharad Pawar Purandar Visit Today) :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. आज ते सकाळी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहेत.

आज कॉमन मॅन आरके लक्ष्मण यांचा जन्मदिवस (RK Laxman birthday) : आज कुंचल्याचे जादूगार आर. के. लक्ष्मण यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स रेखाटली. त्यांनी कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details