कोटा :देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेविषयी (NEET UG 2023) मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी मेलवर पाठवणे सुरू केले आहे. आज 4 वाजेपासून हे मेल विद्यार्थ्यांना मिळू लागतील. या परीक्षेला 20 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. काही विद्यार्थ्यांना हे मेल आज रात्री किंवा उद्या सकाळी मिळतील.
विद्यार्थ्यांसाठी सूचना :कोटाच्या खासगी कोचिंग संस्थेचे करिअर समुपदेशन तज्ञ पारिजात मिश्रा म्हणाले की त्यांनी आजपासून विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी पाठवण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया एक-दोन दिवस सुरू राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेले ईमेल आयडी तपासावेत. ज्या विद्यार्थ्यांना हा मेल मिळाला नसेल त्यांनी थोडी वाट पाहावी. कारण एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना मेल करणे राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीला शक्य नसेल. काही-काही वेळात विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी मिळत राहील, असा सल्ला मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमार्फत आयोजित करण्यात आलेली नीट यूजी 2023 परीक्षेसाठी 20 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील साधरण 97 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे, म्हणजेच साधरण 20 लाख 25 हजार परीक्षार्थी होते.
लवकरच मिळेल रेकॉर्ड रिस्पांस शीट आणि उत्तरपत्रिका :राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने स्कॅन कॉपी जाहीर केल्या आहेत. आता त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचे रेकॉर्ड रिस्पांस शीट दिली जाईल. विद्यार्थी स्कॅन कॉपी आणि रेकॉर्ड रिस्पांस शीटची जुळवणूक करू शकतील. जर यात काही तफावत असेल तर विद्यार्थी आपली तक्रार दाखल करू शकतात. दुसरीकडे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रश्नपत्रिका आणि उत्तर की देखील जारी करेल. उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवरही आक्षेप नोंदवता येतील. येत्या ४ ते ५ दिवसांत हे सर्व जाहीर केले जाईल, असे तज्ज्ञ पारिजात मिश्रा यांनी सांगितले.