महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

National Sisters Day 2022 : जगभरात 'नॅशनल सिस्टर्स डे' होतोय साजरा; सिक्रेट शेअर करणाऱ्या ताईला आज द्या खास भेट - Happy Sisters Day everyone

बहिणीशी असलेल्या नात्याची तुलना जगात कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. आपण आपल्या इच्छा, गुपिते आणि स्वप्ने आपण आपल्या बहिणींसोबत शेअर करत असतो. ती आपला भावनिक आधारस्तंभ ( Sister is Emotional pillar )असते. भावंडांमधील हे छान नाते साजरे करण्याचा आजचा दिवस आहे. बहिणींमधील कधीही न तुटू शकणारे बंध साजरे करण्यासाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी नॅशनल सिस्टर्स डे साजरा केला जातो ( first Sunday of August ). यंदा हा दिवस ७ ऑगस्टला आहे.

National Sisters Day 2022
नॅशनल सिस्टर्स ड

By

Published : Aug 7, 2022, 2:00 PM IST

मुंबई -जगभरात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा दिवस नॅशनल सिस्टर्स डे ( National Sisters Day ) म्हणून साजरा केला जातो. खर म्हणजे नॅशनल सिस्टर्स डे ची सुरूवात कधी झाली हे अद्यापही कोणाला माहीत नाही. मात्र, असे मानले जाते की अमेरिकेतल्या टेनेसी राज्याच्या ट्रिसिया एलिओग्रामने 1996 मध्ये बहिणींमधील प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणून ऑगस्टचा पहिला रविवार हा दिवस नॅशनल सिस्टर्स डे म्हणून साजरा केला. आणि त्यानंतर आता जगात सर्व ठिकाणी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी नॅशनल सिस्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.

ऑगस्टचा पहिला रविवारी -बहिणीशी असलेल्या नात्याची तुलना जगात कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. आपण आपल्या इच्छा, गुपिते आणि स्वप्ने आपण आपल्या बहिणींसोबत शेअर करत असतो. ती आपला भावनिक आधारस्तंभ ( Sister is Emotional pillar )असते. भावंडांमधील हे छान नाते साजरे करण्याचा आजचा दिवस आहे. बहिणींमधील कधीही न तुटू शकणारे बंध साजरे करण्यासाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी नॅशनल सिस्टर्स डे साजरा केला जातो ( first Sunday of August ). यंदा हा दिवस ७ ऑगस्टला आहे.

सिस्टर्स डे चा इतिहास -सिस्टर हा शब्द जुना नॉर्स शब्द 'सिस्टिर' पासून आला आहे. जो प्रोटो-जर्मनिक शब्द 'swester' असा आहे. कालांतराने त्यात शाब्दीक बदल होत गेले. विविध लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे स्वेस्टर शब्दाचे रूपांतर सिस्टरमध्ये झाले.

सिस्टर्स डे चे महत्त्व -बहीण - भावंडे किंवा मित्र जे मुलींना, महिलांना स्वत:ला बहिणीसारखे मानतात त्यांच्यासाठी सिस्टर्स डे दिवस हा एक महत्त्वाचा दिवस असतो ( Importance Of National Sisters Day ). या दिवशी लोक त्यांच्या बहिणींसोबत सामायिक केलेले बंध साजरे करतात. बहिणींना विशेष भेट देण्यासाठी, त्यांचा दिवस मजेत जाण्यासाठी भावंडांकडून खास गोष्टींची नियोजन तेले जाते. हा दिवस केवळ अमेरिका, इंग्लंड, केनडा अशा विकसीत देशात साजरा होत नाही तर भारतात सुद्धा ही दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. बहिणींमधील किंवा बहिणीसाठीचे प्रेम दृढ करणे आणि त्यांना एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

दिवस कसा साजरा करावा? - नॅशनल सिस्टर्स डे साजरा करावा असा प्रशेन अनेकांपुढे असतो ( How To Celebrate National Sisters Day ). तो साजरा करण्याचा एक मार्ग म्हणजे बहिणीसोबत चित्रपट पहायला बाहेर जाणे( Watching movies with sister ) . त्यांच्या आवडीचे रात्रीचे जेवण बनवणे. किंवा जेवायला बाहेर घेऊण जाणे ( Take out sister to dinner ). त्यांच्या आवडीची शॉपिंग करून देणे . या दिवशी आपल्या बहिणीसाठी तिच्या आवडत्या ठिकाणी सहलीची व्यवस्था करा. तिच्या मनोरंजणाची व्यवस्था करू देणे जेणेकरून तुमच्या लाडक्या बहिणीचा दिवस आनंदात जाऊ शकतो

सर्वांना सिस्टर्स डे च्या शुभेच्छा( Happy Sisters Day everyone )

हेही वाचा -Friendship Day 2022 : ऑगस्टच्या पहिल्याच रविवारी फ्रेंडशिप डे का साजरा करतात? जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details