महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी चित्ररथ कसे निवडले जातात ? जाणून घ्या - चित्ररथ निवड प्रक्रिया

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी कोणकोण त्यांच्या चित्ररथाचे प्रस्ताव पाठवू शकतात ? त्यासाठी विविध निकष काय आहेत? चित्ररथ निवड प्रक्रिया कधी सुरू होते आणि कोण सहभागी होऊ शकते? सहभागी राज्य किंवा केंद्र सरकारचे विभाग त्यांच्या चित्ररथांमधून काही दाखवू शकतात का? ते विशिष्ट आकाराचे असावेत का? याबाबत सविस्तरपणे जाणून घेवू या.

Republic Day 2023
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी झांकी

By

Published : Jan 24, 2023, 10:31 AM IST

नवी दिल्ली : भारतातील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीच्या राजपथावर भव्य परेड निघते. राजपथावरील मिरवणुकीत देशाच्या सैन्याच्या रेजिमेंट्स आणि राज्यांमधील चित्ररथ दाखवले जातात. 1950 च्या दशकापासून टेबलाक्स आणि परेड ही वार्षिक परंपरा आहे. किंबहुना, दरवर्षी सप्टेंबरमध्ये संरक्षण मंत्रालय सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकारचे विभाग आणि काही घटनात्मक अधिकार्‍यांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले जाते.

पत्र पाठवून सहभागी होण्याचे आमंत्रण : संरक्षण मंत्रालयाने सर्व 80 केंद्रीय मंत्रालये, निवडणूक आयोग आणि निती आयोग यांना पत्र पाठवून त्यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले जाते. पत्रानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चित्ररथांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सादर होणार्‍या चित्ररथांची निवड प्रक्रिया विकास आणि मूल्यमापनाच्या विविध टप्प्यांतून जाते.

चित्ररथ निवड निकष :चित्ररथांची निवड प्रक्रिया ही स्केच, डिझाइन आणि कार्यप्रदर्शनाच्या विषयांच्या प्रारंभिक कौतुकाने सुरू होते. तज्ज्ञ समिती आणि राज्ये, केंद्रशासित प्रदेश, विभाग, मंत्रालय यांच्यातील अनेक संवादांनंतर, ते चित्ररथांच्या त्रि-आयामी मॉडेलसह समाप्त होते. निवड प्रक्रिया ही दीर्घकाळ आणि कठीण असते. संरक्षण मंत्रालय या निवड प्रक्रियेसाठी कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, नृत्यदिग्दर्शन आणि इतर क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा एक तज्ज्ञ गटाची नियुक्ती करते.

साडेतीन ​शक्तीपीठे ​- दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशभरातील राज्यातून चलचित्रे सादर केली जातात. त्यानुसार विविध राज्ये आणि मंत्रालये उत्तमोत्तम संकल्पना निवडतात. कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देतात. यंदा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, स्त्री शक्तीचा जागर सादर केला जाणार आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजा भवानीचे श्री. क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी, वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा यात समावेश होतो. या देवींच्या भव्य, तितक्याच सुंदर प्रतिमांचे त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन सर्व देशवासीयांना करण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले आहे.

​गेल्यावर्षी जैवविविधतेचे दर्शन - देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दि​नानिमित्त राजपथावर देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी​ होतात. महाराष्ट्रा​ने चित्ररथ​ सादर करताना, जैवविविधतेचे दर्शन​ घडवले होते. महाराष्ट्राचा राज्य​ ​प्राणी 'शेकरू' 'ब्ल्यू मॉरमॉन' फुलपाखरू, मोर तसेच विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती, अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ​ दाखवण्यात आला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला​ होता.

हेही वाचा :Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनी 'हे' पुरस्कार होतात जाहीर, जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details