शेतकऱ्यांचा सर्जा राजाचा सण म्हणजेच बैलपोळा हा सण शेतकरी आणि शेतात राबणाऱ्या बैला विषयी आहे. या सणाच्या दिवशी बैलांना संपूर्ण दिवसभर आराम करू देण्यात येतो. या वर्षी 2022 मध्येे बैल पोळा हा सण Bail Pola Festival श्रावण अमावस्या, 26 ऑगस्ट ला शुक्रवार या दिवशी आहे. तर काय आहे या बैलपोळाचे महत्व ,कसा साजरा केला जातो पोळा घ्या जाणून
बैलांची सजावट केली जाते या दिवशी बैलाला शेतकरी हा अंघोळ घालतो. बैलांची अंघोळ झाल्यानंतर बैलांच्या शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावले जातात व बैलांच्या खांद्यांना तुपाने किंवा तेलाने हळद लावली जाते. व त्यांचे शिंग खूप छान दिसेल अशे बनविण्यात येत असते. त्यांच्या शींगा मध्ये खोबळे लावण्यात येत असतात. पोळा या सणा मध्ये बैलांची सजावट ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आता बैलांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, वेगवेगळ्या रंगाने काढले जात असतात. त्यांना झुल घालण्यात येत असते. झुल ही कापडाची, माखमलीची वेगवेगळ्या रंगाची असते. झुल घालण्यात आल्यानंतर बैल हे खूप छान दिसत असतात. बैलांना माळा घुंगार, फुगे बांधण्यात येत असतात. बैल हे खूप छान सजवण्यात येत असतात. त्याच बरोबर बैलांना पोळ्या च्या दिवसी नव नवीन वेसण ,नवीन कासरा, नवीन झुला, नवीन कासरे व काही जण मोराची पीसारे लावून बैलाला साजवत असतात. प्रत्येक शेतकरी हा बैलाला आपल्या परीने चांगल्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर आपल्या बैलाला नैवद्य म्हणून गोड पुरणाची पोळी व इतर छान बनवलेले जेवण नैवद्य म्हणून देतात. त्यनंतर बैलाला ओवाळणी करून त्यांची पूजा करण्यात येत असते.