महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Selection Health Insurance Policy : जाणून घ्या, आरोग्य विमा योजनेची कशी करावी निवड? - सर्वात चांगली आरोग्य विमा कोणती

आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला सर्व अटी आणि नियम माहित असणे ( terms of health insurance policy ) आवश्यक आहे. विशेषतः, विमा कंपनीने लादलेली उप मर्यादाची माहिती असणे आवश्यक आहे. तरच, तुमच्या वॉलेटमधून खर्च न करता वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य होईल. तुमच्या सर्व हॉस्पिटलायझेशन खर्चाचा समावेश असलेल्या पॉलिसीला प्राधान्य ( Prioritize a Health policy ) द्या.

health insurance policy
आरोग्य विमा योजना

By

Published : May 21, 2022, 11:45 AM IST

हैदराबाद-वैद्यकीय महागाई झपाट्याने वाढत असताना, अनपेक्षित वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आरोग्य विम्याची निवड अधिक गरजेची झाली आहे. आपत्कालीन वैद्यकीय उपचार आणि हॉस्पिटलायझेशनमुळे आपल्या आर्थिक आरोग्यावर परिणाम होऊ ( Health insurance without sublimit ) शकतो. अशा प्रकारे, आरोग्य विमा योजनांमधील गुंतवणूक ( Health insurance news in Marathi ) ही तुमचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक असू शकते.

पॉलिसीचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला सर्व अटी आणि नियम माहित असणे आवश्यक आहे. विशेषतः, विमा कंपनीने लादलेली उप-मर्यादा ( Sub Limit of health insurance ) जाणून घेतले तर तुमच्या वॉलेटमधून खर्च न करता वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीवर मात करणे ( medical inflation rising faster ) शक्य होईल. तुमच्या सर्व हॉस्पिटलायझेशन खर्चाचा समावेश असलेल्या पॉलिसीला प्राधान्य द्या. काहीवेळा उच्च प्रीमियम्स आणि परवडण्याबद्दल चिंतेत असलेले लोक उप-मर्यादा असलेल्या पॉलिसीचा ( protected against unforeseen medical emergencies ) लाभ घेण्याकडे वळतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या आजाराची किंवा खर्चाची रक्कम आधीच निश्चित करत आहात. मग विमा कंपनीने त्यानुसार नुकसान भरपाईची अपेक्षा करणे आहे.

विमा कंपन्या त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करतात- उदाहरणार्थ, तुमच्याकडे 5 लाख रुपयांची पॉलिसी आहे असे गृहीत धरू. कोणत्याही रोगाच्या उपचारासाठी उप-मर्यादा 30,000 रुपये निश्चित केली जाऊ शकते. यापलीकडे पॉलिसीधारकाला खर्च उचलावा लागतो. रुग्णवाहिकेचे भाडे पॉलिसीच्या रकमेच्या एक टक्‍के निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे आजार किंवा उपचारासाठीही विशिष्ट रक्कम ठरलेली असते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या खर्चावर आणि डिस्चार्जनंतरच्या खर्चावरही मर्यादा असतील. हे उपचाराच्या दिवशी निश्चित केले जाईल किंवा निश्चित रकमेचे आश्वासन दिले जाईल. यामधून विमा कंपन्या त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करतात.

पॉलिसीधारकांनी अटींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा-विमा कंपन्या सामान्यत: मोतीबिंदू, सायनस, किडनी स्टोन, मूळव्याध आणि प्रसूतीच्या उपचारांसाठी असे निर्बंध लादतात. आजारांची यादी आणि उप-मर्यादा एका विमा कंपनीकडून दुसर्‍या विमा कंपनीमध्ये बदलतात. पॉलिसीधारकांनी अटींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. योग्य समजून घेतल्यानंतर, चांगली तयारी करणे चांगले आहे. अन्यथा, रुग्णालयात दाखल केल्याने आपल्या वॉलेटमधून खर्च करण्यासह समस्या उद्भवू शकतात.

तुमच्यावर पडू शकतो आर्थिक ताण - विमा कंपन्या खोलीचे भाडे, आयसीयू, रुग्णवाहिका शुल्क, घरगुती उपचार आणि ओपीडी यावर उप-मर्यादा लादतात. जर खोली भाड्याची मर्यादा पॉलिसी मूल्याच्या एक टक्का असल्याचे नमूद केले असेल, तर 5 लाख रुपयांची पॉलिसी असलेल्यांना फक्त 5,000 रुपये दिले जातील. रुग्णालयाच्या खोलीचे भाडे यापेक्षा जास्त असल्यास त्याचा तुमच्यावर आर्थिक ताण पडेल. काही विमा कंपन्या शेअरिंग आणि स्पेशल रूमचेही नियमन करतात. ही मर्यादा असूनही, त्यांना 2-3 टक्के भरावे लागतील, याची खात्री करा.

विमा कंपन्या हॉस्पिटलायझेशनच्या 30 दिवस आधी आणि घरी 90 दिवसांपर्यंत खर्च देतात. कधीकधी विमा कंपन्या दिवसांची संख्या कमी करू शकतात. पॉलिसी घेताना हे काळजीपूर्वक पहावे. शक्य तितक्या कमी उप-मर्यादा असलेली पॉलिसी असणे केव्हाही उत्तम असते. प्रीमियम थोडा जास्त असला तरी भविष्यातील खर्चाच्या तुलनेत तो कमी असतो.

-बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सचे मुख्य तांत्रिक अधिकारी टी.ए. रामलिंगम.

हेही वाचा-Fraud Insurance policies : इंन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहा

हेही वाचा-Mumbai High Court: विमा कंपनीने आपदग्रस्तांना भरपाई देताना मानसिक अपघाताचाही विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय

हेही वाचा-LIC To Make Stock Market Debut : मंगळवारी एलआयसीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणार, दर इश्यू किमतीपेक्षा कमी असेल

ABOUT THE AUTHOR

...view details