महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाममध्ये भाजप चढणार सत्तेचा सोपान - Kerala exit polls

एबीपी आणि सी-वोटरच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 152-164 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये 292 जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आहे.

Exit Poll
एक्झिट पोल

By

Published : Apr 29, 2021, 9:30 PM IST

Updated : Apr 30, 2021, 12:24 PM IST

हैदराबाद -पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज आज जाहीर झाले आहेत. विविझ एजन्सीने विविध राज्यांमध्ये कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार याचा अंदाज केले आहेत.

'ईटीव्ही भारत'ने वर्तवलेली आकडेवारी..

पश्चिम बंगाल एक्झिट पोल
आसाम एक्झिट पोल
केरळ एक्झिट पोल
तामिळनाडू एक्झिट पोल

इतर संस्थांनी वर्तवलेला अंदाज..

आसाम

आसाम भाजपा कांग्रेस इतर
इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया 75-85 40-50 1-4
सी वोटर 65 59 2
टुडेज चाणक्य 61-79 47-65 0-3
सीएनएक्स 74-84 40-50 1-3
जन की बात 68-78 48-58 0

केरळ

केरळ एलडीएफ यूडीएफ भाजपा+ इतर
इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया 104-120 20-36 0-2 0-2
सी वोटर 74 65 1 0
टुडेज चाणक्य 93-111 26-44 0-6 0-3
सीएनएक्स 72-80 58-64 1-5 0
जन की बात -- -- -- --

तामिळनाडू

तामिळनाडू एआयएडीएमके+ डीएमके+ एएमएमके+ एमएनएम+
इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया 38-54 175-195 1-2 0-2
सी वोटर 64 166 1 1
टुडेज चाणक्य 46-68 164-186 0 0-8
सीएनएक्स 58-68 160-170 4-6 0-2
जन की बात 102-123 110-130 0 1-2

पुद्दुचेरी

पुद्दुचेरी भाजपा+ कांग्रेस+ इतर+
इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया 20-24 6-10 0-1
सी वोटर 19-23 6-10 1-2
टुडेज चाणक्य -- -- --
सीएनएक्स 16-22 11-13 0-0
जन की बात 19-24 6-11 0-0

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल भाजपा टीएमसी डावे+ इतर
इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया 134-160 130-156 0-2 0-1
सी वोटर 109-121 152-164 14-25 0-0
टुडेज चाणक्य 97-119 169-191 0-4 0-3
सीएनएक्स 138-148 128-138 11-21 0-0
जन की बात 150-162 118-134 10-14 0-

असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज-

एबीपी आणि सी-वोटरच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 152-164 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 109-121 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 14-25 जागांवर विजय मिळू शकतो. पश्चिम बंगालमध्ये 292 जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आहे.

टीएमसीला 42.1 टक्के, भाजपला 39.1 टक्के आणि काँग्रेसला 15.4 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत.

टाईम्स नाऊ-सी वोटरएक्झिट पोलच्या अंदाजानुसारबंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत येण्याचे दिसत आहे. टीएमसीला 158, भाजपला 115 आणि डावे-काँग्रेसला 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियानुसार आसाममध्ये भाजपला 75 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 40-50 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना एक ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.

रिपब्लिक-सीएनएक्सच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला43, टीएमसीला 133, सीपीएम-काँग्रेसला 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये डीएमके आघाडीला 160-170 जागांचा अंदाज आहे. तर सत्ताधारी दल एआयएडीएमके 58-68 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

असे पार पडले चार राज्यांसह केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान..

  1. पश्चिम बंगालमध्ये 292 विधानसभा जागांसाठी आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या.
  2. आसाममध्ये 126 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
  3. तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान घेण्यात आले.
  4. केरळमध्ये 140 तर पदुच्चेरीच्या 30 जागांसाठी 6 एप्रिला एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली.
Last Updated : Apr 30, 2021, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details