लखनौ - मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार आहे. लखनौमधील मडियाव पोलीस ठाण्यात शरण येणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मडियाव पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. किरण गोसावीचे शेवटचे लोकेशन लखनौ दिसत आहे. दरम्यान मडियाव पोलिसांनी गोसावी शरण असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे.
Aryan khan Drugs Case : साक्षीदार किरण गोसावी लखनौ पोलिसांना येणार शरण, ऑडिओ क्लिप व्हायरल - आर्यन खान ड्रग्स प्रकरण
मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार आहे. लखनौमधील मडियाव पोलीस ठाण्यात शरण येणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मडियाव पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गोसावीवर त्याच्या अंगरक्षक प्रभाकर साईलने शाहरुखकडून कोट्यवधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून गोसावी चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात आर्यन खानसोबत त्याचा एक सेल्फीही व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर किरण गोसावी फरार झाल्यामुळे त्याच्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दरम्यान गोसावी उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना शरण येणार आहे. यापुर्वी पुणे पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे.
मडियाव पोलिस ठाण्याचे अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, किरण गोसावी नावाची कोणती व्यक्ती शरण येणार असल्याची कोणतीही माहिती आम्हाला नाही व अशी कोणतीही सूचना मिळालेली नाही. ऑडिओ क्लिपमध्ये किरण गोसावी म्हणतो की, मी लखनौ पोलिसांनी शरण जाणार आहे. महाराष्ट्रात माझा जीव धोक्यात आहे, त्यामुळे मी लखनौमध्ये आत्मसमर्पण करणार आहे. मला सातत्याने धमकीचे फोन येत आहेत.