महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी दूर - किरण बेदी राज्यपाल पदावरून दूर

किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या राज्यपाल पदावरून हटवल्याची माहिती राष्ट्रपती भवनने दिली आहे. तेलंगाणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

किरण बेदी
किरण बेदी

By

Published : Feb 17, 2021, 7:10 AM IST

Updated : Feb 17, 2021, 9:00 AM IST

पुद्दुच्चेरी -किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवल्याची माहिती राष्ट्रपती भवनने दिली आहे. तेलंगाणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. काँग्रसे पक्षाचे सरकार अस्थिर झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.

तेलंगाणाच्या राज्यपालंकडे तात्पुरता कार्यभार -

"पुद्दुचेरीचे राज्यपाल पद सोडण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी किरण बेदींना दिले आहेत. तेलंगाणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे. जोपर्यंत पुद्दुचेरीला दुसरा राज्यपाल नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत सौंदरराजन कारभार पाहतील, असे अधिकृत वक्तव्य राष्ट्रपती भवनने जारी केले आहे.

काँग्रेस सरकार अस्थिर -

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणस्वामी (V. Narayanasamy) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने ४ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.

Last Updated : Feb 17, 2021, 9:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details