महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Khargone Mob Lynching: चोरीचा आरोप करत दलित युवकाला बेदम मारहाण, धर्म जाणून घेण्यासाठी काढली अंडरवेअर - khargone youth lynched on religion basis

मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये सोयाबीन चोरल्याच्या आरोपावरून एका तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा धर्म तपासण्यासाठी तरुणाचे कपडे उतरवण्यात आले. निर्दयी लोकांनी जमावाच्या रुपात तरुणाला मारहाण केली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हा तरुण दलित समाजाचा असल्याचे समोर आले आहे. ( Khargone Mob Lynching ) ( Khargone Youth Punished By Mob ) ( khargone Mob Lynching video viral ) ( khargone youth lynched on religion basis )

KHARGONE MOB LYNCHING YOUTH PUNISHED BY MOB IN SUSPICION OF THEFT
चोरीचा आरोप करत दलित युवकाला बेदम मारहाण, धर्म जाणून घेण्यासाठी काढली अंडरवेअर

By

Published : Aug 7, 2022, 7:09 PM IST

खरगोन ( मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात चोरीचा आरोप करत शिक्षा देताना तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे आणि सोया फूड कंपनीशी संबंधित 4 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणासोबत झालेल्या क्रूरतेची हद्द एवढी झाली की, त्याने पोलिसांकडे न्यायासाठी दाद मागितली, तर उलट एका पोलिसाने त्यालाच मारहाण केली. तरुणाबाबत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तो दलित समाजाचा आहे. ( Khargone Mob Lynching ) ( Khargone Youth Punished By Mob ) ( khargone Mob Lynching video viral ) ( khargone youth lynched on religion basis )

अंडरवेअर काढून धर्म तपासला : खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या नीमराणी या औद्योगिक परिसरात चोरीच्या संशयावरून काही लोकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर आरोपींनी तरुणाला खांबाला बांधून लाथा मारल्या. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याच्यावर विशिष्ट समाजाचा असल्याचा आरोप करत त्याची अंडरवेअर काढून त्याचा धर्म तपासला.

चोरीचा आरोप करत दलित युवकाला बेदम मारहाण, धर्म जाणून घेण्यासाठी काढली अंडरवेअर

पोलिसांनी तरुणालाच कारागृहात पाठवले : मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण कासरवाड पोलीस ठाणे आणि खालटांका पोलीस चौकीत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणालाच अटक करून कारागृहात पाठवले. याप्रकरणी पीडित तरुणाने आरोप केला आहे की, "माझ्या मुलाचे कपडे काढून त्याचे हात-पाय बांधून, जनावराप्रमाणे मारहाण केली. माझा मुलगा हिंदू आहे की नाही, हेही तपासले."

टीआयची होणार चौकशी : नर्मदा फूड कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एसपी धरमवीर सिंह यांनी खालटांका पोलिस चौकीचे प्रभारी राजेंद्र सिंह बघेल यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपींवर कारवाई न केल्याबद्दल आणि पीडितेला तपासाशिवाय तुरुंगात टाकल्याबद्दल उत्तर मागितले आहे. आता महेश्वर एसडीओपी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :ऑटोच्या धडकेने महिला पोलीस झाली संतप्त.. रस्त्यातच चालकाला केली बेदम मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details