महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress Strategy : कर्नाटकातील विजयानंतर कॉंग्रेसची नजर आता अन्य राज्यांवर, वाचा स्पेशल रिपोर्ट

कर्नाटकात मिळालेल्या प्रचंड विजयामुळे उत्साही असलेल्या काँग्रेसची नजर आता या वर्षी होणाऱ्या अन्य राज्यांतील निवडणुकांकडे आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा 24 आणि 25 मे रोजी निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेतील. वाचा ईटीव्ही भारतचे वरिष्ठ वार्ताहर अमित अग्निहोत्री यांचा हा रिपोर्ट.

Kharge Rahul Priyanka
खरगे राहुल प्रियंका

By

Published : May 21, 2023, 10:25 PM IST

नवी दिल्ली : कर्नाटक या त्यांच्या गृहराज्यात पक्षाचा विजय सुनिश्चित केल्यानंतर, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांसाठी रोडमॅप तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या राज्यांमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राहुल आणि प्रियंका सक्रीय सहभाग घेतील : कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतला सांगितले की, 'मल्लिकार्जुन खरगे 24 आणि 25 मे रोजी मतदानाच्या तयारीचा आढावा घेतील. या राज्यांचे पक्ष प्रभारी वरिष्ठ राज्य नेत्यांसोबत आढावा बैठकीमध्ये सहभागी होतील. राज्य संघांनी आगामी निवडणुकांसाठी रोडमॅप तयार करावा आणि संघटनात्मक अंतर लवकरात लवकर भरून काढावे अशी खरगे यांची इच्छा आहे'. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. ते देखील या राज्यांसाठी रणनीती करण्यात सक्रीय सहभाग घेतील.

तीन राज्यांमध्ये कॉंग्रेस-भाजप थेट लढत : या चार राज्यांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. तर तेलंगणात काँग्रेस बीआरएसच्या विरोधात आहे. कॉंग्रेससमोर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. तर मध्य प्रदेशात 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या फुटीमुळे काँग्रेसची राज्यातील सत्ता गेली होती. ती परत आणण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.

मध्य प्रदेशात पक्ष मजबूत झाला : कॉंग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रभारी सचिव कुलदीप इंदोरा म्हणाले की, 'कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशातही पक्ष एकजूट आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे पक्षाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले जात असून सर्व ज्येष्ठ नेते त्यांना पाठिंबा देत आहेत. ही एकजूट मतदारांमध्ये चांगला संकेत देत आहे. मध्य प्रदेशचे कॉंग्रेस प्रभारी सचिव सीपी मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, 'मध्य प्रदेश हे देशातील एकमेव राज्य आहे जेथे मंडल स्तरावरील संघांची सर्वाधिक टक्केवारी (70 टक्के) स्थापन करण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. हे स्थानिक संघ निवडणुकीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावतात.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत परतण्याची आशा : कुलदीप इंदोरा यांनी आशा व्यक्त केली आहे की, राजस्थानातील गेहलोत विरुद्ध पायलट सत्ता संघर्ष लवकरच मिटला जाईल. तसेच काँग्रेस यावेळी राज्यातील दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रवृत्ती मोडून काढेल. ते म्हणाले की, 'मला स्थानिक लोकांकडून संकेत मिळाले आहेत की लोक राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाला निवडून आणण्याच्या मन:स्थितीत आहेत. इंदोरा यांच्या म्हणण्यानुसार, सचिन पायलट यांनी नुकतीच काढलेली पाच दिवसांची जनसंघर्ष यात्रा, ज्याला पक्षातील अनेकांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा अपमान म्हणून पाहिले, ती भ्रष्टाचाराच्या मुद्द्याविरुद्ध होती. या विरोधात काँग्रेसही बऱ्याच काळापासून आवाज उठवत आहे. ते म्हणाले की, राजस्थान सरकारने कल्याणकारी योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्या असून मतदारांना ते आवडत आहे. छत्तीसगडमध्येही आमच्या सरकारने लोककल्याणासाठी खूप काही केले आहे.

हेही वाचा :

  1. DK Shivkumar : काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतरही डीके शिवकुमार खूश नाहीत, जाणून घ्या का?
  2. Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
  3. G20 Meet Security : G20 दरम्यान 26/11 सारख्या हल्ल्याचा कट उघड, विदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी बदल

ABOUT THE AUTHOR

...view details