नवी दिल्ली Sukha Dunuke Shot Dead :कॅनडामध्ये आणखी एका कथित खलिस्तनावादी गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुखविंदर सिंग उर्फ सुख्खा दुनुके या गुंडाला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सुखावर तब्बल 15 गोळ्या झाडण्यात आल्यानं त्याचा मृत्यू ( Khalistani Terrorist Killed In Canada ) झाला. ही घटना कॅनडातील विन्निपेग शहरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान या खुनाची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई गँगनं स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे.
कट्टर खलिस्तानवादी दहशतवादी :सुखविंदर सिंग उर्फ सुखा दुनेके हा कट्टर दहशतवादी होता. सुखविंदर सिंग उर्फ सुखा दुनेके हा भारतातून बनावट पासपोर्टच्या मदतीनं 2017 मध्ये कॅनडात पळून गेला होता. कॅनडातही त्यानं आपल्या खंडणीच्या कारवाया सुरुच ठेवल्या होत्या. त्यामुळे सुखविंदर सिंग उर्फ सुखा दुनेके आल्पावधीतच कुख्यात झाला होता.
अर्शदीप सिंगचा होता उजवा हात :सुखविंदर सिंग उर्फ सुखा दुनेके हा कॅनडात पळून गेल्यानंतर गुन्हेगारी विश्वात अधिकच सक्रिय झाला होता. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेनं त्याला मोस्ट वॉन्टेडच्या यादीत टाकलं होतं. कॅनडात राहून त्यानं भारतात खंडणीचा व्यवसाय सुरू केला होता. अनेक व्यावसायिकांना तो खुलेआम खंडणीसाठी धमकी देत होता. कुख्यात गँगस्टर अर्शदीप सिंगचा सुखविंदर सिंह उर्फ सुखा दुनेके हा उजवा हात असल्याचं समजलं जात होतं. त्यामुळे सुखविंदर सिंग उर्फ सुखा दुनेके याची मोठी दहशत निर्माण झाली होती.